Sugar Production : अंतिम टप्प्यातील साखरनिर्मिती मंदावली

राज्यातील अंतिम टप्प्यातील गळीत हंगाम मंद गतीने सुरू आहे. ३१ मार्चअखेर २१० पैकी १६६ साखर कारखाने बंद झाले आहेत.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Kolhapur News राज्यातील अंतिम टप्प्यातील गळीत हंगाम (Sugarcane Season) मंद गतीने सुरू आहे. ३१ मार्चअखेर २१० पैकी १६६ साखर कारखाने बंद झाले आहेत. साखर निर्मिती (Sugar Production) मात्र अतिशय कासव गतीने होत आहे.

शेवटच्या टप्‍प्यात गाळपास येणाऱ्या कमी रिकव्‍हरीच्या उसामुळे साखर निर्मितीही मंदावली आहे. गेल्‍या पंधरा दिवसांत केवळ २ लाख टन साखर राज्यात तयार झाली आहे.

३१ मार्चअखेर १०४ लाख टन साखर राज्यातील कारखान्यांनी निर्माण केली आहे. १५ मेच्या अहवालानुसार १०२ लाख टन साखर तयार झाली होती. सध्या नगर, छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागातच प्रामुख्याने जादा साखर कारखाने सरू आहेत. कोल्हापूर व अमरावती विभागांचा पूर्ण हंगाम संपला आहे.

सध्या कारखाने सुरू असलेल्या भागांतील साखर उतारा ८ ते ९ टक्के इतका आहे. यामुळे साखर कारखाने अपेक्षित साखर उत्‍पादन करू शकत नसल्याची स्थिती आहे. राज्यातील सर्वाधिक साखर उताऱ्याच्या कोल्हापूर, पुणे, नांदेड या विभागांतील बहुतांश साखर कारखाने बंद झाले होते.

Sugar Production
Sugar Mill Pending FRP : ‘एफआरपी’ थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा

याचा साहजिकच परिणाम राज्याच्या गळीत हंगामावर होत आहे. राज्यात ५० साखर कारखाने सुरू दिसत असले, तरी उत्पादनात मात्र फारशी वाढ दिसत नाही. अन्य विभागात १ ते १० पर्यंत कारखाने सुरू आहेत.

Sugar Production
Sangli Sugar Mill : सांगलीतील १४ कारखान्यांची धुराडी थंडावली

साखर उत्‍पादनात १५ ते १६ टक्‍के घट शक्य

गेल्या वर्षी मार्च अखेरपर्यंत केवळ ३० कारखाने बंद झाले होते. ११४० लाख टन ऊसगाळप करून ११८ लाख टन साखर तयार झाली होती. या तुलनेत यंदा १०४५ लाख टन उसाचे गाळप होऊन १०४ लाख टन साखर तयार झाली.

राज्यात यंदा उन्हाळा तीव्र असल्‍याने याचाही परिणाम ऊसतोडणीवर होत आहे. अंतिम टप्प्यातील ऊस तोड करणे कारखान्यांना कसरतीचे बनत आहे. मजूर सांभाळण्याची कसरतही सुरू आहे. गेल्या वर्षीच्‍या तुलनेत साखर उत्‍पादनात १५ ते १६ टक्‍के घट येण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com