Hapus Mango : रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी पुणे बाजारात रवाना

रत्नागिरी : जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान रत्नागिरी तालुक्याला मिळाला. गावखडीतून सहदेव पावसकर यांच्या बागेतून पेटी चार डझनाची तर गोळप येथील बावा साळवी यांची दोन डझनचा बॉक्स मुंबईत रवाना झाला.
Hapus Mango
Hapus MangoAgrowon

रत्नागिरी : जिल्ह्यातून हापूस आंब्याची (Hapus Mango) पहिली पेटी पाठवण्याचा मान रत्नागिरी तालुक्याला मिळाला. गावखडीतून सहदेव पावसकर यांच्या बागेतून पेटी चार डझनाची तर गोळप येथील बावा साळवी यांची दोन डझनचा बॉक्स मुंबईत (Mumbai Mango Market) रवाना झाला. चार डझनच्या या पेटीला २० हजार रुपये दर (Mango Rate) मिळेल, असा विश्वास बागायतदार पावसकर यांनी व्यक्त केला.

Hapus Mango
Mango, Cashew : आंबा, काजू पीक मोहर लांबणीवर

वातावरणातील बदलामुळे यंदा आंबा बागायतदार त्रस्त आहे. परंतु नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हापूसची पहिली पेटी रवाना झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सहदेव पावस्कर यांची चार महिन्यापासून यासाठी मेहनत घेतली होती. आंब्याची पेटी श्री आई महाकाली आंबा ट्रान्स्पोर्ट च्या माध्यमातून पुणे मार्केटला रवाना होत आहे.

Hapus Mango
Kesar Mango : पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा केशर आंबा होणार निर्यात

या बाबत आंबा बागायदार पावसकर म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात फुलोरा आला होता. मात्र याच कालावधीत भरपूर पाऊस सुरू होता. मोहोर कुजून जात होता. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाचा जोर होता. हा मोहोर टिकून राहावा यासाठी त्या झाडावर शेड काढली. यावर आतापर्यंत सातवेळा कीटकनाशक फवारण्या करण्यात आल्या असून दोनवेळा झाडांना खत दिली गेली. प्रचंड मेहनत घेतल्यानंतर फळे टिकली असून आमची पहिली पेटी बाजारात रवाना होत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे प्रसिद्ध आंबा बागायतदार प्रकाश शंकर साळवी ऊर्फ बाबा साळवी यांनी आपल्या बागेतील २०२३ या नवीन वर्षातील पहिली दोन डझनची आंबा पेटी मुंबई मार्केटला सोपान शंकर नलावडे आणि कंपनी यांच्याकडे पाठवली आहे. अजूनही दर निश्चित झाला नाही. पावसापासून मोहोर वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केल्याचे श्री. साळवी यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील पहिली पेटी बाजारात रवाना होतं असल्याने बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अजूनही मोहोर वेळेत आलेला नसल्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होण्यासाठी एप्रिल महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com