Sugarcane FRP : ‘कृष्णा’ची पहिली उचल तीन हजार, ‘जयवंत शुगर’ची २,९५० रुपये

बैठक वेळेवर सुरू न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत निषेध नोंदविला व नियोजन भवनाच्या सभागृहातून ‘वॉक आउट’ केला.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

सातारा : ऊसदराचा (Sugarcane FRP) प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारीच उशिरा पोहोचल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) व रयत क्रांती संघटनेच्या (Rayat Kranti Sanghatana) पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करीत बैठकीवर बहिष्कार टाकला, तर उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित कारखान्यांचे प्रतिनिधी व बळिराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ऊसदराची कोंडी फोडली.

यामध्ये कृष्णा कारखान्याने पहिली उचल एकरकमी तीन हजार व जयवंत शुगर २,९५१ रुपये देण्याचे जाहीर केले, तर उर्वरित कारखान्यांनी कमी दर जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. २३) ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांचे प्रतिनिधी व सर्वपक्षीय शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी यांची बैठक बोलावली होती.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : सांगलीत दुसऱ्या दिवशीही ऊसतोड बंद

बैठक नियोजन भवनात दुपारी १२ वाजता होती; पण जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना एक व्हीसी लागली. त्यामुळे ते बैठकीस वेळेवर येऊ शकले नाहीत. बैठकीला पोलिस अधीक्षक समीर शेख, महसूल उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे आदी उपस्थित होते.

बैठक वेळेवर सुरू न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत निषेध नोंदविला व नियोजन भवनाच्या सभागृहातून ‘वॉक आउट’ केला. त्यानंतर दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी बैठकीच्या ठिकाणी आले. त्या वेळी उपस्थित कारखान्यांचे प्रतिनिधी व बळिराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : केवळ १८ कारखान्यांनी दिली एकरकमी ‘एफआरपी’

या वेळी बैठकीस उशीर झाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर बैठक सुरू केली. बैठकीत ऊसदरावर चर्चा होऊन प्रत्येक कारखान्याच्या प्रतिनिधींनी आपापल्या कारखान्याची एकरकमी दर सांगितला; पण कारखान्यांची पहिली उचल २,२०० ते २,७०० रुपये राहिली.

बळिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी याला आक्षेप घेतला, तसेच एकाही कारखान्याने तीन हजारांपर्यंत उचल जाहीर केली नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बैठकीच्या शेवटी कृष्णा कारखान्याच्या प्रतिनिधीने पहिली उचल एकरकमी तीन हजार रुपये जाहीर केली, तसेच जयवंत शुगरने २,९५१ रुपये पहिली उचल जाहीर करत ऊसदराची कोंडी फोडली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना करत बैठक संपविली.

कारखान्यांनी जाहीर केलेली पहिली उचल

जयवंत शुगर -२,९५१, कृष्णा कारखाना -३,०००, श्रीराम जव्हार -२,७२१, शरयू दत्त इंडिया -२,७००, सह्याद्री -२,३७५, बाळासाहेब देसाई कारखाना -२,३१८, अजिंक्यतारा -२,२९०, माण- खटाव -२,७००, जरंडेश्वर -२,२७३, किसन वीर -२,३५०, खंडाळा -२,३८०, वर्धनगड ॲग्रो -२,७००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com