jaggery Market : नीरामध्ये गुळाला क्विंटलला चार हजार रुपयांचा दर

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या गुळाच्या लिलावामध्ये गुळाला गेल्या महिन्यापेक्षा जास्त म्हणजेच १०० ते १५० रुपये जास्तीचा भाव मिळाला.
Jaggery Market
Jaggery MarketAgrowon

Jaggery Market नीरा : सणासुदीचा काळ सध्या सुरू झाला आहे. त्यानंतर गावोगावच्या यात्रा, जत्रा सुरू होतील. या पार्श्‍वभूमीवर गुळाची मागणी (Jaggery Market) वाढली आहे. नीरा बाजार समितीमध्ये (Jaggery Market) बुधवारी (ता. ८) झालेल्या गुळाच्या लिलावात गुळाला (Jaggery Rate) ४ हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर मिळाला.

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या गुळाच्या लिलावामध्ये गुळाला गेल्या महिन्यापेक्षा जास्त म्हणजेच १०० ते १५० रुपये जास्तीचा भाव मिळाला.

पुढील काळात येणारे विविध सण आणि यात्रा, जत्रा यामुळे गुळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नीरा व परिसरात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळे आहेत.

Jaggery Market
Jaggery Powder : गूळ पावडर कशी तयार केली जाते?

त्यामुळे या भागातील गूळ येथे विक्रीसाठी येत असतो. कोल्हापूरनंतर नीरा येथील गूळ मार्केट मोठे आहे. या दोन मार्केटवरतीच राज्यातील गुळाचा बाजार ठरतो. लिलावात गुळाला चांगला दर मिळाला.

त्यामुळे उत्पादकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. बाजारात केडगाव, साखरवाडी, मुरूम या भागांतून गूळ विक्रीस आला होता.

गेल्या महिन्यात पाव (२५० ग्रॅम) किलोच्या गुळाच्या ढेपेची किंमत ३१०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल होती. या महिन्यात ती वाढून ३५०० ते ४००० रुपये झाली.

Jaggery Market
Jaggery Market : अंतिम टप्प्यात गूळ दरात वाढ; आवक निम्म्यावर

दहा टन गुळाची आवक

अर्धा किलो गुळाच्या ढेपेची किंमत प्रतिक्विंटल ३१५० ते ३५०० एवढी होती. ती ३३०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल झाली. एक किलो ढेपेची किंमत मागील महिन्यात प्रतिक्विंटल ३३०० ते ३५०० प्रतिक्विंटल होती. ती वाढून ३२०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल झाली. तर बुधवारी (ता. ८) दिवसभरात नीरा बाजारात १० टन गुळाची आवक झाली.

बाजारातील गुळाची किंमत मागणी व पुरवठ्यानुसार कमी-जास्त होते. सध्या गुऱ्हाळे पक्व उसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे गुळाचे उत्पादन आणि पुरवठा कमी आहे. तर सणासुदीच्या दिवसांमुळे गुळाची मागणी वाढली आहे. साहजिकच भाव वाढले आहेत. पुढील काही काळ गुळाचे भाव हे चढेच असतील.

- शांतिकुमार कोठडिया, गूळ व्यापारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com