Palm Cultivation : पाम लागवडीसाठी मोफत ठिबक, रोपांचा पुरवठा!

भारतात दरवर्षी २३० ते २३५ लाख टन खाद्यतेलाचा वापर होतो. मात्र भारताला गरजेच्या ६५ टक्के आयात करावी लागते. भारत दरवर्षी १३० ते १४० लाख टन खाद्यतेल आयात करतो.
Palm Cultivation
Palm CultivationAgrowon

पुणेः तेलंगणा सरकारनं पुढील चार वर्षांत २० लाख एकरवर पामची लागवड (Palm Cultivation Target Over Twenty Lakh Acre In Telangana) करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. असं झाल्यास तेलंगणा जागतील पाचव्या क्रमांकाचा पाम उत्पादक (Palm Producer) प्रदेश बनेल. मात्र तेलंगणाला हे उद्दिष्ट साध्य करणं तेव्हढं सोप नाही. तेलंगणाला काही अडचणीही येत आहेत.

भारतात दरवर्षी २३० ते २३५ लाख टन खाद्यतेलाचा (Edible Oil) वापर होतो. मात्र भारताला गरजेच्या ६५ टक्के आयात करावी लागते. भारत दरवर्षी १३० ते १४० लाख टन खाद्यतेल आयात करतो. यात जवळपास ८५ लाख टन पामतेलाचा समावेश असतो. सध्या भारतात ३ लाख टनांपेक्षाही कमी पामतेलाचं उत्पादन होतं. त्यामुळं गरज भागवण्यासाठी भारताला इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या देशांवर अवलंबून राहवं लागतं.

पामतेलाची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं पामतेल उत्पादनाला (Paln Oil Production) प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखली आहे. यात तेलंगणा सरकारनं पुढाकार घेतलाय. पुढील ४ वर्षांत २० लाख एकरवर पामची लागवड करण्याचं उद्दिष्ट तेलंगणानं ठेवलय. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तेलंगणा सरकारनं तयारही केली. पाम पिकासाठी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी मोठी धरणं बांधली, कालवे तयार केले आणि लागवडीसाठी अंकुरलेले बियाणंही आयात केल्याचं राॅयटर्स् या वृत्तसंस्थेनं म्हटलंय.

Palm Cultivation
paddy cultivation: ओडिशातील भात लागवडीत २० टक्क्यांची घट

पाम लागवडीसाठी अनुदान आणि इतर पिकांच्या तुलनेत अधिक उत्पन्नाची शक्यता असल्यानं शेतकरीही पाम लागवडीकडे वळात आहेत. पाच एकरवर पामची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्यानं सांगितलं की, मागील काही वर्षांपूर्वी पामची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक एकरातून दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळतंय. मात्र भात शेतीत काबाडकष्ट करूनही मला ४० हजार रुपयेसुध्दा मिळत नाहीत. मागील काही महिन्यांमध्ये पामतेलाच्या दरात मोठी तेजी आली होती. त्यामुळं पामफळं विकणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला होता.

Palm Cultivation
Palm Oil: मलेशिया आणि भारतात पामतेलासाठी सामंजस्य करार

देशात मागील काही वर्षांपासून पाम लागवड सुरु आहे. मात्र किमतीत होणारे बदल, पाण्याची टंचाई आणि फळधारणेसाठी जवळपास चार वर्षांचा लागणारा कालावधी, यामुळं देशातील पाम लागवड संथ गतीने सुरु आहे. देशात आत्तापर्यंत केवळ १० लाख एकरवर पामलागवड झाली. यापैकी बहुतेक लागवड ही आंध्र प्रदेशातील समुद्र किनारपट्टीच्या भागात झाली. मात्र तेलंगणात सध्या पामची लागवड नाही. पण तेलंगणा जगातील पाचव्या क्रमांकाचा प्रदेश होण्याचं स्वप्न पाहतोय.

देशाचा विचार करता वर्षाला ३५ हजार एकरवर पाम लागवड होत आहे. तेलंगणा सरकारनं १० लाख एकरवर पामची लागवड केली, आणि त्यातून उत्पादन घेतलं, तरी वर्षाला २० लाख टन पामतेल मिळेल, असं गोदरेज अॅग्रोवेटचे चावा व्यंकटेश्वर राव यांनी सांगितलं.

ठिबकला प्रोत्साहन

पामच्या एका झाडाला दिवसाकाठी २६५ लिटर पाणी लागते. तेलंगणातील काही भागात पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. गोदावरी, कृष्णा आणि भीमा नद्यांमुळे सिंचनाची सोय झाली. पण काही भागांत पाण्याची टंचाई असते. ही समस्या सोडवण्यासाठी तेलंगणा सरकारनं उपसा सिंचन प्रकल्प उभारले. तसचं या भागात सूक्ष्म सिंचनाला प्राधान्य दिलं जातंय. सूक्ष्म सिंचन यंत्रणा बसवलेल्या शेतकऱ्यांनाच प्रशासन पाम लागवडीची परवानगी देतंय. शेतकऱ्यांना ठिबकचा सर्व खर्च केंद्र आणि राज्य सरकार अनुदानाच्या स्वरुपात देतंय. त्यामुळं ठिबकचा वापर होतोय.

सरकारचाही खर्च वाचणार

पाम लागवड वाढल्यास भाताखालील क्षेत्र कमी होईल. त्यामुळं तेलंगणा सरकारला २५ लाख टन भात खरेदी करावी लागणार नाही. तसंच ठिबक सिंचनाचा वापर झाल्यास वीजेवरचा १५०० कोटींचा खर्च वाचणार आहे, असं येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

रोपांची टंचाई

पाम शेतीचे फायदे आणि सरकारचा पाठिंबा असल्यानं हजारो शेतकरी लागवडीसाठी पुढाकार घेत आहेत. मात्र अचानक मागणी वाढल्यानं सध्या पामच्या रोपांचा मोठा तुटवडा जाणवतोय. तसचं पामची रोपं तयार करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागतो.

तेलंगणातील कंपन्यांनी मागील वर्षी जवळपास १२५ लाख अंकूरलेले बियाणे आयात केले होते, यापासून २ लाख एकरसाठीची रोपे तयार केली. प्रामुख्यानं इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि कोस्टा रिका या देशांनतून आयात झाली. मात्र तरीही टंचाई जाणवतेय. त्यामुळं यंदा १५० लाख अंकूरलेले बियाणे आयात करण्याचं उद्दिष्ट तेलंगणानं ठेवलंय. तर पुढील वर्षात ५०० लाख बियाणे आयात होईल. मात्र देशातील केवळ मुठभर कंपन्याच हे बियाणं पुरवतात. त्यामुळं पाम लागडीसाठी शेतकऱ्यांना रोपे पुरवण्याचं आव्हान तेलंगणा सरकारपुढे असणार आहे.

तेलंगणात पाम लागवडीची तयारी झाली आहे. शेतकरी लागवडीसाठी पुढाकार घेत आहेत. चार वर्षांत लागवड जवळपास संपलेली असेल. त्यानंतर पुढील ७ ते ८ वर्षात तेलंगणात ४० लाख टन पामतेल उत्पादन होईल.
एल वेंकटराम, सचिव, फलोत्पादन विभाग, तेलंगणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com