
कोल्हापूर : ‘‘केंद्र सरकारने यंदाच्या गळीत हंगामात (Sugarcane Crushing Season) गाळप होणाऱ्या उसाच्या (२०२२-२३) ‘एफआरपी’त (Sugarcane FRP) प्रतिटन १५० रुपयांनी वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ आणि आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक बुधवारी (ता.३) झाली. यामध्ये उसाच्या रास्त व किफायतशीर भावात (एफआरपी) (Sugarcane Fair Remunerative Price) वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
गेल्या हंगामात १० टक्के साखर उताऱ्यासाठी २९०० रुपये एफआरपी होती. आता १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ३०५० रुपये (वाहतूक खर्चासहित) मिळतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या एफआरपीत २.६ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी ही एफआरपी लागू असेल.
गेल्या चार वर्षांतील एफआरपी
वर्ष...एफआरपी (प्रतिटन, रुपये)
२०१९-२०...२७५०
२०२०-२१...२८५०
२०२१-२२...२९००
२०२२-२२...३०५०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.