Orange : संत्रापट्टयात फळगळतीचे थैमान

मार्च महिन्यातच पारा ४० अंशाच्या पार गेल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच २ लाख टन बहार गळाला. सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
Orange
Orange Agrowon

नागपूर ः मार्च महिन्यातच पारा ४० अंशाच्या पार गेल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच २ लाख टन बहार गळाला. सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आता संततधार पावसाच्या (Rain) परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव (Fungal Disease Outbreak) वाढल्याने संत्रापट्टयात (Orange Belt) पुन्हा फळगळीने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांची शिफारस संशोधन संस्थांकडून होत नसल्याने शेतकऱ्यांना हे नुकसान बघण्याशिवाय कोणताच पर्याय संत्रा उत्पादकांसमोर (Orange Producer) उरला नसल्याचेही वास्तव आहे.

मृग बहार पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहतो. परंतु गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलामुळे पावसाची अनिश्‍चितता वाढली. त्यातूनच शेतकरी मृग बहाराकडून आंबिया बहाराकडे वळले. अमरावती जिल्ह्यातील एक लाख हेक्‍टरपैकी सुमारे ७० हजार हेक्‍टरवर आता आंबिया बहार घेतला जातो. सिंचनाच्या सुविधा असलेले शेतकरी त्याचे व्यवस्थापन आपल्या पद्धतीने करतात. परंतु यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा ४० अंशाच्या पुढे पोचला.

Orange
Mango Farming : संत्रा पट्ट्यात आंबा, बांबूची व्यावसायिक शेती

जूनपर्यंत तापमान कायम ४० ते ४३ अंशापर्यंत होते. तापमानातील वाढीचा फटका बसत हंगामाच्या सुरुवातीलाच लहान फळांची गळ झाली. एकूण पाच लाख टन उत्पादनांपैकी सुमारे दोन लाख टन लहान आकाराची फळे गळून पडली, असा दावा ‘महाऑरेंज’ने केला होता. यामुळे सरासरी ५०० कोटींचे नुकसान झाले. यातून कसेबसे सावरत बागेतील शिल्लक फळांच्या व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. मात्र जुलै महिन्यात पावसाची संततधार झाली. तर काही भागात अतिवृष्टी नोंदविण्यात आली. तब्बल २१ दिवस सूर्याचे दर्शनच झाले नाही. परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे पुन्हा फळगळ होऊन सुमारे १ लाख २५ हजार टन फळांची गळ झाल्याचा अंदाज ‘महाऑरेंज’चे तांत्रिक सल्लागार सुधीर जगताप यांनी व्यक्‍त केला आहे.

Orange
Orange : शेतकरी पीक नियोजन : संत्रा

आंबिया बहराचे व्यवस्थापन

डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडून डिसेंबर अखेरीस पाणी दिले जाते. परंतु हा बहार पाण्याऐवजी थंडीमुळे जास्त फुटतो. डिसेंबर-जानेवारीत फूलधारणा होते. या हंगामातील फळे नोव्हेंबर महिन्यात तोडणीसाठी येतात.

...यामुळे झाली गळ

कोलेटोट्रिकम, डिप्लोडिया, बॉट्रायटीस, अल्टरनेरिया या चार प्रकारच्या बुरशींचा प्रादुर्भाव फळगळीला कारणीभूत ठरतो. फळमाशीचाही (फ्रूटफ्लाय) काही भागात फटका बसला असल्याचे सुधीर जगताप यांनी सांगितले.

अति पावसाने संत्राझाडे पिवळी होऊन फळगळ होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने हेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत करावी.
प्रशांत देशमुख, संत्राउत्पादक, धोतरखेडा.
संत्राउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शेती करणे खर्चिक झाले आहे. फळगळ होणे, संत्राझाडे सलटने, फवारणीवर होणारा खर्च आता शेतकऱ्यांना न परवडण्यासारखा आहे. लिंबूवर्गीय संशोधन केंद्राने गावे दत्तक घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
रणजित लहाने, संत्राउत्पादक, खांबोरा.
अति पाऊस व हवामान बदलाने मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या फळगळतीने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शासनाने तातडीने मदत देण्याची गरज आहे.
स्वप्नील बोबडे, शेतकरी.
गेल्यावर्षी १५ एकर बागेच्या व्यवस्थापनावर साडेआठ लाख रुपयांचा खर्च झाला. त्यानंतर फळगळ झाली. फळांचा दर्जा मिळाला नाही. परिणामी केवळ दीड लाख रुपये हाती आले.
पुष्पक खापरे, पिंप्रि थुगाव, अमरावती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com