Maize Production : जागतिक मका उत्पादन घटणार

जागतिक पातळीवर २०२२-२३ च्या हंगामात म्हणजेच चालू हंगामात मका उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. जगाचं मका उत्पादन गेल्या हंगामात १२१९ दशलक्ष टन झालं होतं.
Maize Production
Maize ProductionAgrowon

पुणेः चालू हंगामात जागतिक मका उत्पादन (Global Maize Production), वापर आणि शिल्लक साठा (Maize Stock) कमी राहील असा अंदाज आहे. तर काही देशांची मका निर्यातही (Maize Export) घटेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र असं असतानाही देशात मका दरातील (Maize Rate) तेजी काहीशी कमी झालेली दिसत आहे.

जागतिक पातळीवर २०२२-२३ च्या हंगामात म्हणजेच चालू हंगामात मका उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. जगाचं मका उत्पादन गेल्या हंगामात १२१९ दशलक्ष टन झालं होतं. ते यंदा ११७२ दशलक्ष टनांवर स्थिरावण्याचा अंदाज असल्याचं अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं म्हटलंय. म्हणजेच यंदा मका उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा तब्बल ४७ दशलक्ष टनांनी कमी राहील.

उत्पादनासोबतच मक्याचा वापरही २० दशलक्ष टनांनी यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे. मका वापरात पशुखाद्याची मागणी ३ दशलक्ष टनांनी घटेल, असा अंदाजही युएसडीएनं व्यक्त केलाय. पण उत्पादनातील घट ही मका वापरात होणाऱ्या घटीपेक्षा जास्त असेल. त्यामुळं पुढील हंगामासाठी शिल्लक साठाही गेल्यावर्षीपेक्षा ८ दशलक्ष टनांनी कमी राहील, अशी शक्यता आहे.

Maize Production
Maize Rate : जागतिक मका उत्पादनात घट होणार

यंदा अमेरिकेतील मका उत्पादन ३० दशलक्ष टनांनी घटण्याचा अंदाज असून चीन आणि ब्राझीलचे उत्पादन १२ दशलक्ष टनांनी वाढेल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय. तर यंदा इजिप्त, युरोपियन युनियन, जपान, वायव्य आशिया, दक्षिण कोरिया आणि कॅनडा या देशांची आयात वाढणार. तसचं अर्जेंटीना आणि ब्राझीलमधून मका निर्यात वाढणार आहे. तर युक्रेनची मका निर्यात निम्मानं कमी होऊन १३ दशलक्ष टनांपर्यंत घसरेल, असाही अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय.

आंतरराष्ट्रीय बाजारातील मका दराचा विचार करता सध्या दर काहीसे सावरलेले दिसतात. सीबाॅटवर ११ जुलैला मक्याचा दर ७.७९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. त्यानंतर मात्र मक्याच्या वायद्यांत घसरण होत गेली. २२ जुलैला दरानं ९ महिन्यांतील ५.६७ डाॅलरची निचांकी पातळी गाठली होती. त्यानंतर कमी जास्त होत दराने पुन्हा १२ सप्टेंबरला तीन महिन्यांतील उचांकी टप्पा गाठला होता. त्यानंतर पुन्हा काहीसे कमी होत दर सध्या ६.८१ डाॅलरवर आहेत.

Maize Production
Maize Rate : मक्याचा दर का नरमला?

देशातही मक्याच्या दरात मागील तीन महिन्यांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. जुलै महिन्यात मक्याच्या दराने २५०० रुपयांवरून पुढे चाल करत ऑगस्टमध्ये २८०० रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दरात पुन्हा नरमाई आली. वायद्यांमध्ये २२ ऑगस्टला मक्यानं २५८० रुपयांचा टप्पा पार केला होता. मात्र त्यानंतर दरात चढ-उतार होत सप्टेंबर महिन्यात २५०० रुपयांवर वायदे होत आहेत.

बाजार समित्यांमध्येही मका दरात सध्या नरमाई दिसत आहे. सध्या मका दर २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान मिळत आहे. मका महाग झाल्यानं पुशखाद्य उद्योगात तांदूळ आणि बाजारीचा वापर वाढला. परिणामी वाढलेल्या दरात मक्याचा उठाव कमी झाला. त्यामुळं सध्या मका दरातील तेजी कमी झाली, असं जाणकारांनी सांगितलं. देशातील मका दर निर्यात सुरळीत सुरु राहील्यास पुढील दोन महिने सरासरी दर २३०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान राहतील, असा अंदाज उद्योगातून व्यक्त होत आहे.

देशातील मका दरात मागील तीन महिन्यांत मोठे चढ-उतार होत आहेत. चालू महिन्यात दर तुलनेत स्थिर आहेत. सध्या मक्याला सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. निर्यात सुरळीत सुरु राहिल्यास हा दर टिकून राहू शकतो.
गौरव कोचर, शेतीमाल बाजार विश्लेषक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com