Godrej Agrovet: गोदरेज अॅग्रोव्हेट तेलंगणात पाम प्रक्रिया कारखाना उभारणार

गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव यांनी तेलंगणाचे आयटी आणि उद्योग मंत्री के टी रामाराव यांच्याशी कंपनीच्या गुंतवणूक योजनेवर चर्चा केली.
Palm Oil
Palm OilAgrowon

गोदरेज अॅग्रोव्हेट (Godrej Agrovet) ही कंपनी तेलंगणात ऑईल पाम प्रक्रिया (Oil Palm Processing) कारखाना उभारत आहे. त्यासाठी २५० कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. खम्मम जिल्ह्यात सुरू होणाऱ्या या कारखान्याची सुरुवातीची क्षमता ३० टन प्रति तास असणार आहे.

याविषयी प्रसिद्ध झालेल्या सरकारी निवेदनात म्हटलंय की, "पुढच्या टप्प्यात ही क्षमता दुप्पट करण्यात येईल."

Palm Oil
Palm Oil Import : पाम तेलाच्या दरात वाढ

गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव यांनी तेलंगणाचे आयटी आणि उद्योग मंत्री के टी रामाराव यांच्याशी कंपनीच्या गुंतवणूक योजनेवर चर्चा केली.

Palm Oil
Palm Oil Import:रिफाईंड पामतेलाची आयात वाढणार

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना यादव म्हणाले, "हा कारखाना २०२५-२६ पर्यंत सुरू होईल. तसेच या भागातील ऑईल पाम उत्पादकांना सेवा देण्यासाठी १० गोदरेज समाधान केंद्र सुरू केली जातील."

कंपनीने म्हटलंय की, ऑइल पामच्या झाडांची निगराणी करण्यासाठी तसेच प्रतिमा-आधारित पीक सल्लागार सेवा प्रदान करण्यासाठी उपग्रह, शेतकरी अॅप्स आणि ड्रोनसह डिजिटल सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

उद्योग मंत्री के टी रामाराव म्हणाले की, राज्य सरकारने सुमारे ८ लाख हेक्टरवर ऑइल पाम लागवडीला चालना देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com