God Rate : लग्नसराईमुळे सोने तेजाळले

सुवर्णनगरी अर्थात जळगावात दिवाळीनंतर सोने, चांदीच्या दरात तेजीचे चित्र आहे. गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे १,७०० रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात २,५०० रुपयांची वाढ झाली.
Gold Rate
Gold RateAgrowon

जळगाव ः सुवर्णनगरी अर्थात जळगावात (Jalgaon Gold Market) दिवाळीनंतर सोने, चांदीच्या दरात (Gold Rate) तेजीचे चित्र आहे. गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे १,७०० रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात २,५०० रुपयांची वाढ झाली. २६ नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे दरात वाढ झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली. ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांच्यासाठी परतावा घेण्याची ही संधी असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

Gold Rate
Gold rate: देशात सोन्याची खरेदी रोडावणार

यंदा दिवाळीत सोने, चांदीचा दर कायम होता. सोन्याचा दर प्रति तोळा ५१ हजार, तर चांदीचा दर प्रति किलो ५९ हजार होता. तोच दर पाडवा, भाऊबीजेनंतर २८ ऑक्टोबरपर्यंत कायम होता. २९ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात दोनशे, तर चांदीच्या दरात पाचशेची घट झाली होती. ४ नोव्हेंबरला सोने प्रति तोळा ५० हजार ८००, तर चांदी ५९ हजार ५०० (जीएसटीविना) होती.

आता सोन्याचे दर प्रति तोळा ५२ हजार ५००, तर चांदी ६२ हजारांपर्यंत (जीएसटी) गेली आहे. पंधरा दिवसांत सोन्याच्या दरात १,७००, तर चांदीच्या दरात २,५०० रुपयांची वाढ झाली.

काही दिवसांतील दर असे (जीएसटीविना)

तारीख -- सोने प्रति तोळा -- चांदी प्रति किलो

४ नोव्हेंबर--५० हजार ८०० -- ५९ हजार ५००

५ नोव्हेंबर -- ५१ हजार ४०० -- ६१ हजार

९ नोव्हेंबर -- ५१ हजार ८०० -- ६२ हजार

१२ नोव्हेंबर -- ५२ हजार ५०० -- ६२ हजार

१५ नोव्हेंबर -- ५२ हजार ८०० -- ६३ हजार

१७ नोव्हेंबर -- ५१ हजार ६०० -- ६२ हजार

१८ नोव्हेंबर -- ५२ हजार ५०० -- ६२ हजार

लवकरच लग्नसराई सुरू होणार आहे. त्यासाठी आकर्षक प्रकारचे दागिने उपलब्ध करण्यात आले आहेत. सोने, चांदीचे दर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतात. लग्नसराईमुळे सोन्याला मागणी वाढली आहे.
मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com