Gold Market : जळगावात सोने दर ५५ हजार ७०० रुपयांवर स्थिर

सोन्याच्या किमतीत सातत्याने चढउतार होत आहे. केंद्रीय अंदाजपत्रकानंतर दरात सतत घट झाली. मध्यंतरी किंचित वाढ झाली होती.
Gold Market Rate
Gold Market Rate Agrowon

Gold Market Update जळगाव ः सोन्याच्या किमतीत (Gold Rate) सातत्याने चढउतार होत आहे. केंद्रीय अंदाजपत्रकानंतर दरात सतत घट झाली. मध्यंतरी किंचित वाढ झाली होती. आता होळीनंतरही सोन्याच्या दरात (Gold Market Rate) घसरण झाली आहे. सध्या सोन्याला ५५ हजार ७०० रुपये प्रतितोळा, असे दर (विना वस्तू व सेवा कर) मिळत आहेत.

सोन्याचे दर फेब्रुवारीपूर्वी ५८ हजार रुपये प्रतितोळापेक्षा अधिक होते. यातच आंतरराष्ट्रीय बाजारात घडामोडीचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होत आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून येतेय. लग्नसराईत सोने दर स्थिर असल्याने तेवढाच दिलासा मिळत आहे.

Gold Market Rate
Gold Market : सोने बाजारात २५ कोटींची उलाढाल

जळगाव शहरातील सराफ बाजारात होळीच्या दिवशी (ता. ६) २२ कॅरेट सोन्याचे दर ५१९०० रुपये प्रतितोळा असे होते.

तर २४ कॅरेट सोन्याचे दर अंदाजे ५६ हजार ५५० रुपये प्रतितोळा होते. सध्या सोन्याचा दर ५५ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यापर्यंत आहे.

मागील आठवड्यात म्हणजेच सोमवारी (ता. ६) चांदीचा दर ६६ हजार ७०० रुपये प्रतिकिलो होता.

मागील आठवड्याच्या अखेरीस चांदीचा दर ६२ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. मागील आठवड्यात सोने व चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर किंचित वधारले होते. पण त्यात पुन्हा नरमाई आली आहे.

Gold Market Rate
Gold Market : शिखरावर असलेल्या सोन्याची वाटचाल कशी राहील?

ठेवींवरील व्याजदर वाढविण्याचे संकेत

युनायटेड रिझर्व्ह बँकेने ठेवींवरील व्याजदर वाढवून देण्याचे संकेत एका बैठकीत दिले. याचा थेट परिणाम म्हणजे सोन्याच्या मागणीत घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय समस्या आहेत. त्यात विविध बँका, संस्था व देशांची वित्तीय धोरणांत मोठे बदल होत आहेत. याचा परिणामही सोने दरांवर होत आहे.

हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करण्याचे आवाहन केंद्रीय संस्था करीत आहेत. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारी अॅपदेखील उपलब्ध असून, ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे सोन्याची शुद्धता तपासता येते. या अॅपद्वारे तक्रारही करण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com