Vegetable Rate : सोलापुरात कोथिंबीर, मेथीसह हिरव्या मिरचीला उठाव

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूसह हिरव्या मिरचीला चांगला उठाव मिळाला, शिवाय मागणीतील सातत्यामुळे दरातही चांगलीच सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
Green Chili Rate
Green Chili RateAgrowon

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur APMC) आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूसह हिरव्या मिरचीला चांगला उठाव (Green Chili Demand) मिळाला, शिवाय मागणीतील सातत्यामुळे दरातही (Vegetable Rate) चांगलीच सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Green Chili Rate
Vegetable : शेतकरी नियोजन ः वेलवर्गीय भाजीपाला

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबिरी, मेथी आणि शेपूची रोज आठ ते दहा हजार पेंढ्यापर्यंत आवक राहिली. शिवाय भाज्यांना मागणीही चांगली आहे. भाज्यांची आवक स्थानिक भागातूनच राहिली. गेल्या पंधरवड्यापासून भाज्यांना चांगला उठाव मिळतो आहे. परिणामी दरात सुधारणा होते आहे.

Green Chili Rate
Vegetable : मिरची, वांगी उत्पादनातून मिळाला उन्नतीचा मार्ग

कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, मेथीला किमान ९०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये तर शेपूला किमान ७०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरव्या मिरचीलाही पुन्हा एकदा चांगला उठाव मिळाला, तिचे दरही तेजीत राहिले.

Green Chili Rate
Vegetable Rate : सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर

हिरव्या मिरचीची रोज ४० ते ५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १८०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. कांदा दरात या सप्ताहात मात्र जैसे थे स्थिती राहिली. कांद्याची आवक रोज ८० ते १०० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

डाळिंबाला पुन्हा उठाव

डाळिंब बाजारात गेल्या काही दिवसात सातत्याने तेजीचे वातावरण आहे. मूळात आवक कमी असल्याने दर वधारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. डाळिंबाची आवक सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर या स्थानिक भागातूनच झाली. डाळिंबाची साधारण रोज एक ते दोन टनापर्यंत आवक राहिली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक १८ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com