Urad Procurement : सरकार आयात उडीद खरेदी करणार

२०२१-२२ च्या हंगामात देशात २७ लाख ६० हजार टन उडदाचं उत्पादन झालं होतं. मागील खरिपात सरकारने उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहिर केला होता.
Urad
UradAgrowon

पुणेः देशात सध्या उडदाचे दर (Urad Rate) तेजीत आहेत. त्यामुळं उडीद डाळीचाही भाव (Urad Dal Rate) वाढलाय. सणासुदीच्या काळात उडीद (Urad Market) आणखी भाव खाण्याची शक्यता आहे. त्यामुळं केंद्र सरकार नाफेडमार्फत आयात (NAFED Urad Import) उडदाची खरेदी (Urad Procurement) करणार आहे.

Urad
Urad : यंदा उडीद भाव खाण्याची शक्यता

२०२१-२२ च्या हंगामात देशात २७ लाख ६० हजार टन उडदाचं उत्पादन झालं होतं. मागील खरिपात सरकारने उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहिर केला होता. मात्र नाफेडने शेतकऱ्यांकडून केवळ दीड हजार टन खरेदी केल्याची नोंद नाफेडच्या वेबसाईटवर आहे. तर यंदा उडदाची लागवड जवळपास ५ टक्क्यांनी घटून ३६ लाख हेक्टरवर झाली. त्यातच पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसतोय. त्यामुळं यंदा उत्पादन कमी राहण्याचा अंदाजही व्यक्त होतोय. त्यामुळं देशात सध्या उडीद डाळीचे दर वाढत आहेत. मागील आठवडाभरात उडदाच्या डाळीचे भाव सरासरी ५ रुपयांनी वाढले. काही बाजारांमध्ये उडीद डाळीचा सरासरी भाव ११० ते १२० रुपये प्रतिकिलोवर पोचलाय.

Urad
Urad : उडदाचा हंगाम साधणार का?

पुढील दोन महिने सणांचे आहेत. उडदाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारला दर नियंत्रणासाठी उडीद पुरवठा करणं गरजेचं आहे. मात्र सरकारकडे उडदाचा केवळ ३५ हजार टन बफर स्टाॅक आहे. त्यातच सध्या देशात उडदाची आवक बाजारात वाढलेली नाही. त्यामुळं केंद्र सरकारने नाफेडला व्यापाऱ्यांकडून आयात उडदाची खरेदी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी निविदाही मागवल्या आहेत. मात्र त्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा न काढता आयातदारांकडून निविदा मागवल्या आहेत. नाफेड २५ हजार ते ३५ हजार टन आयात उडीद खरेदी करण्याची शक्यता आहे. रोज २ हजार टन उडदाची खरेदी होईल. नाफेड आयात मालाची पहिल्यांदाच खरेदी करत नाही. यापुर्वी तीन वेळा नाफेडने अशी खरेदी केली आहे.

आयात उडीद महाग

सध्या आयात उडदाचे दर ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. जो व्यापारी कमी किमतीत उडीद देईल, त्याच्याकडून नाफेड खरेदी करणार आहे. पण कोणता व्यापारी चालू बाजारभावापेक्षा कमी दरात नाफेडला उडीद देईल? म्हणजेच आयात उडीद जास्त दरानेच खरेदी करावा लागेल. त्यासाठी सरकारला जास्त पैसा मोजावा लागेल.

हमीभावाने खेरदी का केली नाही?

सरकारने शेतकऱ्यांचा माल बाजारात आला तेव्हा खरेदी केली असती तर ही वेळ आली नसती. उडीद आवकेच्या ऐन हंगामात नाफेड खरेदीत नसल्यानं खुल्या बाजारात शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांपेक्षाही कमी दर मिळाला. नाफेडने या काळात खेरदी केली असती तर शेतकऱ्यांनाही किमान हमीभाव मिळाला असता, आणि सरकारलाही ६ हजार ३०० रुपये क्विंटलने उडीद खरेदी करता आला असता.

विदेशातील शेतकरी, व्यापाऱ्यांना फायदा

देशातील उत्पादन कमी झाल्यानंतरही सरकारने हमीभाव खरेदीचा आधार दिला नाही. त्यामुळं यंदा शेतकरी पर्यायी पिकांकडे वळाले आहेत. परिणामी चालू हंगामात लागवड कमी झाली. सरकारवर आयात उडीद खरेदी करण्याची वेळ आली. त्याऐवजी सरकारने खरेदीत उतरून बाजाराला आधार दिला असता तर उत्पादन कमी राहिल्यानं खुल्या बाजारातही दर सुधारले असते. पण असं झालं नाही. सरकारनं देशातील शेतकऱ्यांचं भलं करण्याऐवजी म्यानमारमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांचचं भलं करण्याचं ठरवलंय की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

नाफेडकडे सध्या ३५ हजार टन उडीद आहे. उडदाची उपलब्धता वाढावी यासाठी सरकारने आयात उडीद खरेदीचा निर्णय घेतला. सध्या आयात उडदाचा दर ७ हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे आयात उडदाचे दर वाढू शकतात.
राहूल चौहान, कार्यकारी संचालक, आयग्रेन इंडिया, नवी दिल्ली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com