Jaggery Rate : गूळदरासाठी कोल्हापुरात उत्पादक आक्रमक

गुळाला किमान हमीभाव मिळावा, व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक बंद व्हावी, यासह कर्नाटकातून येणारी गुळाची आवक थांबवावी या मागणीसाठी येथील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ बाजारात गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २२) आक्रमक भूमिका घेत गूळ सौदे बंद पाडले.
kolhapur Jaggery Market
kolhapur Jaggery MarketAgrowon

कोल्हापूर : गुळाला किमान हमीभाव (Jaggery MSP) मिळावा, व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक बंद व्हावी, यासह कर्नाटकातून येणारी गुळाची आवक (Jaggery Arrival) थांबवावी या मागणीसाठी येथील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ बाजारात (Jaggery Market) गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २२) आक्रमक भूमिका घेत गूळ सौदे बंद पाडले.

kolhapur Jaggery Market
Jaggery Market : कोल्हापुरी गुळाच्या बाजारपेठेचा बदलतोय ‘ट्रेण्ड’

गुळाचे दर वाढणार नाहीत तोपर्यंत गूळ सौदे चालू करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. अखेर गुळाला चांगले भाव देण्यासाठी प्रयत्न करू, कर्नाटकातून या हंगामात तरी गुळाची आवक होणार नाही अशा उपाययोजना करू, असे आश्‍वासन प्रशासक प्रकाश जगताप यांनी दिल्यानंतर सौदे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

kolhapur Jaggery Market
Jaggery Rate : शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे बंदच राहणार

सकाळी दहाच्या सुमारास सौदे सुरू झाल्यानंतर काही गुळाचे सौदे ३७०० रुपयांच्या वर निघाले तर काही गुळाचे सौदे त्यापेक्षा कमी दरात निघाले. यामुळे शेतकरी संतप्त झाले. सौदे सुरू करण्यास नकार देत वाढीव दराची मागणी केली.

शेतकऱ्यांनी गूळ सौदेप्रश्‍नी यल्गार पुकारल्यानंतर प्रशासन जागे झाले. त्यांनी दर घसरणीला कारणीभूत ठरणाऱ्या कर्नाटकी गुळाची तपासणी सुरू केली. दुपारी दोन वाजेपर्यंत बैठकांच्या फैरी सुरूच होत्या. श्री. जगताप, सचिव जयवंत पाटील, के. बी. पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गूळ उत्पादकाबरोबर बैठक सुरू होती.

संतप्त शेतकऱ्यांनी गुळाला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी एकमुखाने मागणी केली. गुळाचा दर घसरून ३ हजारांवर आला आहे. किमान ३७०० रुपये दर मिळावा, जेणेकरून उत्पादन खर्च निघेल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बाजार समितीत येणारा कर्नाटकी गूळ रोखावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली. या वेळी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेरून येणाऱ्या गुळाची तपासणी सुरू केली. अखेर कर्नाटकी गुळाला पायबंद करण्याच्या आश्‍वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

गुळाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय

कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उत्पादक दर घसरल्याने चांगलाच हवालदिल झाला आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याने गुऱ्हाळ घरे बंद करण्याऐवजी गुळाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे. कोल्हापूरचा गूळ हा दर्जेदार आणि साखरमिश्रित नसावा, असाही निर्णय घेण्यात आला. बाजार समितीत शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com