GM Mohari : मोहरीच्या जीएम वाणाला पूर्ण मान्यता मिळाली का?

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या प्रक्षेत्रांवर घेतलेल्या चाचण्यांमध्ये डीएमएच-११ या वाणाची उत्पादकता वरुणा वाणापेक्षा २८ टक्क्यांनी जास्त असल्याचे सिद्ध झाल्याचा दावाही डॉ. पेंटल यांनी केला आहे.
GM Mustard
GM MustardAgrowon

पुणेः ‘सेंटर फॉर जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप प्लांट'ने (सीजीएमसीपी) जनुकीय सुधारित मोहरी वाणाच्या (GM Mustard Verity) पर्यावरणीय प्रसारणाला मान्यता दिली. मात्र सीजीएमसीपीने (CGMCP) परवानगी देताना या वाणाच्या क्षेत्रीय प्रात्याक्षिके करावेत असे म्हटले आहे. म्हणजेच या चाचण्या दोन वर्षे होणार आहेत.

GM Mustard
GM Mustard : मोहरीच्या जीएम वाणाला परवानगी

दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दीपक पेंटल आणि त्यांच्या शास्त्रज्ञ गटाने डीएमएच-११ हे जनुकीय सुधारित वाण विकसित केले आहे. हे वाण विकसित करताना सध्या भारतात लोकप्रिय असलेले वरुणा वाण आणि पूर्व युरोपातील अर्ली हीरा-२ या दोन वाणांमधील जनुक वापरून डीएमएच-११ वाण विकसित करण्यात आले आहे, असे दीपक पेंटल यांनी सांगितले.

GM Mustard
GM Mustard : जीएम मोहरीच्या पर्यावरणीय प्रसाराला ‘जीईएसी’ ची शिफारस

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या प्रक्षेत्रांवर घेतलेल्या चाचण्यांमध्ये डीएमएच-११ या वाणाची उत्पादकता वरुणा वाणापेक्षा २८ टक्क्यांनी जास्त असल्याचे सिद्ध झाल्याचा दावाही डॉ. पेंटल यांनी केला आहे. तसेच पुढील दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी हे वाण उपलब्ध होईल, असेही पेंटल यांनी सांगितले.

सीजीएमसीपीने जीएम मोहरी वाणाला पर्यावरणीय प्रसारणास हिरवा कंदील दाखला तरी पर्यावरण मंत्रालयाची या संमती मिळणे आवश्यक आहे. तसेच सीजीएमसीपीने परवानगी देताना या वाणाच्या क्षेत्रीय प्रात्याक्षिके करावेत असे म्हटले आहे. मधमाश्या आणि इतर परागीकरण करणाऱ्या जिवांवर या जीएम वाणाचा काय परिणाम होतो? हे तपासण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या देखरेखीखाली दोन वर्षे प्रात्याक्षिके घ्यावेत, अशी शिफारसही सीजीएमसीपीने केली आहे. त्यामुळे किमान दोन वर्षे तरी हे जीएम वाण शेतकऱ्यांना मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. सीजीएमसीपीच्या शिफारशीमुळे या वाणाच्या प्रसारणावर आक्षेपही घेतला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com