Sugarcane Production : उत्तर प्रदेशात अति पावसाचा उसाला फटका

ऊस उत्पादनात सातत्याने आघाडीवर असणाऱ्या उत्तर प्रदेशात यंदाही साखर उत्पादन घटीचे शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
Sugarcane Production
Sugarcane ProductionAgrowon

कोल्हापूर : ऊस उत्पादनात (Sugarcane Production) सातत्याने आघाडीवर असणाऱ्या उत्तर प्रदेशात (UP Sugarcane Production) यंदाही साखर उत्पादन (Sugar Production) घटीचे शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यातील मध्य व पूर्वेकडील प्रदेशात अनेक ठिकाणी अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने ऊस क्षेत्रामध्ये पाणी साचून राहिले आहे. सातत्याने पाणी साचून राहिल्याने पीक कुजण्याचा धोका असून याचा विपरित परिणाम उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादन व उताऱ्यावरही होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. उसाच्या उत्पादनात घट आल्याने परिणामी साखर उत्पादनही घटेल असा अंदाज आहे.

Sugarcane Production
Sugarcane : शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत यंदा ऊसप्रश्न येणार चव्हाट्यावर

राज्यात अजूनही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याने पूर्ण पाऊस थांबल्यानंतरच उसाला कितपत फटका बसला हे सांगता येईल, असे सूत्रांनी सांगितले. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून उत्तर प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे. इतर खरीप पिकाबरोबर उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वारे व पावसामुळे अनेक ठिकाणी तोडणीस आलेला ऊस आडवा झाला आहे. या ठिकाणी उसाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने उत्पादनातही घट अपेक्षित आहे.

उत्तर प्रदेशात यंदा साखरेचे निव्वळ उत्पादन १२० लाख टन (इथेनॉलकडे वळणाऱ्या साखरेसह) होईल असा अंदाज होता. सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने उत्पादन अंदाजा इतकी होईल, असे चित्र होते. पण दिलासादायक असणारा पाऊस नंतरच्या टप्प्यात मात्र अडचणीचा ठरत गेला. ऊस क्षेत्र असणाऱ्या अनेक ठिकाणी अति पावसामुळे पाणी साचून राहिले.

Sugarcane Production
Sugarcane FRP : एफआरपी आपली अन् गुजरातची

उत्तर प्रदेशातील काही ऊस जातींना जादा पाणी साचल्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. पण कोणत्या भागात किती दिवस पाणी साचले आहे याचा निश्‍चित अंदाज अजूनही कारखानदारांना येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादन किती प्रमाणात घटेल हे निश्‍चित नाही पण ज्या भागात अति पाऊस झाला आहे तिथे मात्र ऊस उत्पादनात घट होईल, असे तेथील कारखाना सूत्रांनी सांगितले.

ऑक्टोबरच्या उत्तरार्धापासून परतीचा पाऊस आपला मुक्काम उत्तर प्रदेशातून हलवेल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे. हा अंदाज खरा ठरला तर उसाचे होणारे नुकसान कमी प्रमाणात होऊ शकते, असे तेथील ऊस उद्योगातील प्रतिनिधींनी सांगितले. देशातील बाजारपेठेमध्ये यंदाच्या हंगामातील साखर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकते. तोपर्यंत उत्तर प्रदेशात अति प्रमाणात होणाऱ्या पावसाची स्थिती सामान्य होईल व तेथील शेतकऱ्यांना व साखर उद्योगालाही दिलासा मिळेल, असा आशावाद उत्तर प्रदेशातील साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला.

कमी आणि अति पावसाचा परिणाम

उत्तर प्रदेशात गेले सहा महिने ऊस पिकासाठी चांगले गेले नाहीत. सुरुवातीला कमी पाऊस व हवामानातील बदलामुळे उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे ऊस वाढीवरही प्रतिकूल परिणाम झाला. सप्टेंबरमध्ये पावसास प्रारंभ झाल्यानंतर ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. समाधान देणारा पाऊस नंतर मात्र चिंता निर्माण करून गेला. या सर्व घटनांमुळे उत्तर प्रदेशात यंदा ऊस उत्पादनात घट होईल, अशी भीती साखर उद्योगातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com