Chilies Rate : बाजारात वाळलेल्या मिरचीच्या तेजीचा ठसका कायम

शीतगृहात साठवणूक केलेला लसूण मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्याने लसणाचे दर गडगडले आहेत.
Red Chili Rate
Red Chili RateAgrowon

नागपूर : शीतगृहात साठवणूक (Cold Storage) केलेला लसूण मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्याने लसणाचे दर गडगडले आहेत. दुसरीकडे वाळलेल्या मिरचीच्या तेजीचा ठसका कायम असल्याचे चित्र कळमना बाजार समितीत (Kalmana APMC) अनुभवता येण्यासारखे आहे.

देशभरात सर्वदूर कोल्डस्टोरेजमधील लसूण बाजारात दाखल झाला आहे. परिणामी लसणाचे दर गडगडले असून ते गेल्या आठवड्यात ५०० ते ३५०० रुपयांवर होते. या आठवड्यात लसूण दर काहीसे सुधारत १००० ते ५००० रुपये क्‍विंटलवर पोचले. येत्या काळात कोल्डस्टोरेजमधील लसणाची आवक मंदावल्यानंतर दरात आणखी तेजी येईल, अशी शक्‍यता व्यापारी वर्तवित आहे. सद्या कळमना बाजारात लसणाची आवक २८० क्‍विंटलपर्यंत आहे. दुसरीकडे वाळलेल्या मिरचीचे दर गेल्या महिनाभरापासून स्थिर आहेत.

Red Chili Rate
Citrus Crop : लिंबूवर्गीय संस्था आणि शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठात सामंजस्य करार

११००० ते १८००० रुपये असा दर मिरचीला होता. या आठवड्यात १२००० ते १८००० रुपयांवर ते पोचले. मिरची आवक ४०५ क्‍विंटलची आहे. आले दरात काहीशी तेजी आली असून गेल्या आठवड्यात २६०० ते ४००० रुपये असा दर असताना या आठवड्यात ३००० ते ४००० रुपयांवर दर पोचले. टोमॅटो दरात मात्र घसरण अनुभवली गेली. गेल्या आठवड्यात ५०० क्‍विंटलपर्यंत आवक असताना या आठवड्यात टोमॅटो आवक १००० क्‍विंटलपर्यंत गेली. परिणामी दर गेल्या आठवड्याच्या २००० ते ३००० वरुण १५०० ते १७०० रुपयांवर आले. आवक अशीच राहिल्यास दर स्थिर राहणार असे व्यापारी सांगतात.

चवळी शेंगांची आवक गेल्या आठवड्यात १२० तर या आठवड्यात ८० क्‍विंटलची होती. चवळी शेंगाचे दर १५०० ते २५०० असे आहेत. भेंडीची आवक ८० क्‍विंटल आणि दर २००० ते २५०० असहे होते. गवार शेंग आवक २०० क्‍विंटल आणि दर ३५०० ते ४००० रुपये राहिले. गेल्या आठवड्यात गवार शेंग ४५०० ते ५००० रुपये होती. वाल शेंगाचे व्यवहार ४००० ते ४५०० रुपयांनी होत असून आवक १४० क्‍विंटलची होती.

बाजारात हिरव्या मिरचीची नियमीत आवक असून ती २०० क्‍विंटलच्या घरात आहे. ३५०० ते ३७०० रुपयांनी मिरचीचे व्यवहार झाले. ढोबळी मिरचीलाही ३५०० ते ३७०० रुपयांचा दर मिळाला अनु आवक १५० क्‍विंटलची होती. कोथींबीर आवक ३५० क्‍विंटल तर दर ३००० ते ५००० रुपये होता. कारलीच्या दरात घसरण नोंदविण्यात आली. ३००० ते ४००० रुपयांवरून ३५०० ते ४००० रुपयांवर कारल्याचे दर पोचले. बाजारात पालकाची आवक ११० क्‍विंटल आणि दर २५०० ते ३५०० होते. मेथी ५००० ते ६००० रुपये क्‍विंटल आणि आवक १३० क्‍विंटलची होती. सीताफळाची आवक आता ५० क्‍विंटलवर पोचली असून दर ५००० ते १०००० रुपये होते.

भुसार मालाची स्थिती

बाजारात गव्हाची आवक १८१ क्‍विंटल तर दर २४०० ते २७०० असा होता. तांदूळ आवक १० क्‍विंटल आणि दर २७०० ते ३०००, हरभरा आवक ४६ क्‍विंटल असून दर ४२५२ ते ४४०० असा होता. तुरीचे व्यवहार ६७०० ते ७००० रुपयांनी होत आवक १६८ क्‍विंटल नोंदविली गेली. सोयाबीनची आवक ७९८ क्‍विंटल असून ४२०० ते ५०७६ रुपयांचा दर सोयाबीनला मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com