GM Crop : पिकांच्या जीएम वाणांची वाटचाल कशी झाली?

भारत सरकारच्या ‘सेंटर फॉर जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप प्लांट'ने (सीजीएमसीपी) जनुकीय सुधारित मोहरी वाणाच्या पर्यावरणीय प्रसारणाची शिफारस केली आहे.
GM Crop
GM CropAgrowon

पुणेः भारत सरकारच्या ‘सेंटर फॉर जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप प्लांट'ने (Center For Genetic Manipulation Of Crop Plant) (सीजीएमसीपी) जनुकीय सुधारित मोहरी (GM Mustard) वाणाच्या पर्यावरणीय प्रसारणाची शिफारस केली आहे. जीएम पिकांविषयी पुन्हा चर्चा रंगू लागली. मोहरीच्या (Mustard) या वाणाला पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे विरोधही होत आहे.

जगात जनुकीय सुधारित पिकांचा इतिहास फार जुना नाही. ९० च्या दशकापासून वातावरण बदलाच्या झळा जागतिक शेतीला जाणवू लागल्या होत्या. दुसऱ्या बाजूला जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविण्याचे आव्हान जगासमोर होते.

GM Crop
GM Crops: ‘जीएम’बाबत सरकार आणि ‘आयसीएआर’चे धोरण एकच

त्यातच बदलत्या वातावरणामुळे पिकेही धोक्यात येत होती. त्याच वेळी उपलब्ध असलेल्या पिकांच्या वाणांच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या होत्या. त्यामुळे जगातील आघाडीचे संशोधक कंपन्या पिकांच्या नवीन वाणांवर संशोधन करत होते. यात सर्वांत पुढे होती बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी मोन्सॅन्टो.

GM Crop
GM Crop Ban : जनुकीय चाचण्यांवर सरसकट बंदी नको

मोन्सॅन्टो ही अमेरिकतील कंपनी होती. मात्र आता मोन्सॅन्टो जर्मनीतील बायर कंपनीने विकत घेतली. त्यामुळे मोन्सॅन्टो बायर या नावाने ओळखली जाऊ लागली आहे. मोन्सॅन्टो (बायर) कंपनीने १९९६ मध्ये जगातील पहिले जीएम पीक वाण विकसित केले. ते सोयाबीनचे वाण होते. सोयाबीनचे हे वाण ग्लायफोसेट सहनशील होते. म्हणजेच सोयाबीनचे पहिले तणनाशक सहनशील जीएम वाण बाजारात आले. त्यानंतर लगेच जवळपास ३० देशांनी जीएम तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. या देशांमध्ये सोयाबीन, मका, टोमॅटो, स्क्वॅश, पपई, कापूस आणि शुगरबीटचा समावेश आहे.

भारतात पहिले जीएम वाण कापसात आले. मोन्सॅन्टोने विकसित केलेले बीटी कापूस वाण २००२ मध्ये भारतीय शेतकऱ्यांना मिळाले. शेतकऱ्यांना बीटी कापूस वाण मिळाल्यानंतरच भारतीय कापूस शेतीचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा केला जातो. भारत कापूस उत्पादनात जगात पहिल्या स्थानावर पोहोचला. तर कापूस निर्यातीत चीननंतर जगात दुसरे स्थान पटकावले. मात्र त्यानंतर दोन दशकं होत आली, तरी भारताने दुसऱ्या कोणत्या जीएम पीक वाणाला परवानगी दिली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com