Cotton Market : कापूस बाजार कधीपर्यंत दबावात राहील?

कापसाचे नरमलेले दर आजही कायम आहेत. नेमकं याच काळात बाजारातील कापूस आवकही वाढलेली दिसते. पण पुढील काळात कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

पुणे : देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव (Cotton Rate) नरमले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापसाचे भाव (Cotton Bajarbhav) ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांपर्यंत होता. पण नंतर दरात क्विंटलमागं जवळपास ५०० रुपयांची घट झाली.

नरमलेले दर आजही कायम आहेत. नेमकं याच काळात बाजारातील कापूस आवकही वाढलेली दिसते. पण पुढील काळात कापूस (kapus) दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तर डिसेंबर महिना कापूस बाजारासाठी नरमाईचाच होता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापूस दरानं ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांपर्यंत टप्पा गाठला होता.

पण काहीच दिवसांमध्ये कापूस दरात नरमाई येत गेली. मागील १० ते १२ दिवसांपासून कापूस दर ५०० रुपयांपर्यंत नरमले आहेत. सध्या ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयाने कापूस विकला जातोय.

रुपया मजबुत झाल्याचा परिणाम

मागील काही दिवसांपासून डाॅलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला. एक डाॅलरच्या तुलनेत ८४ रुपयांपर्यंत झालेले अवमुल्यान आता कमी झाले. सध्या डाॅलरचा दर ८१.६७ रुपयांवर पोचला.

रुपया मजबूत झाल्यामुळं देशातून कापूस निर्यात काहीशी महाग झाली. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील दराच्या तुलनेत भारतीय कापसाचा भाव काहीसा वाढला. पण हा भाव केवळ रुपया मजबूत झाल्यामुळं वाढला. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.

वायदेबंदीचा परिणाम

वायदेबंदीचाही परिणाम कापूस दरावर झाला. कापसाचे वायदे सुरु असल्यास शेतकऱ्यांना पुढील काही महिन्यांतील कापूस दराचा अंदाज येत असतो. त्यामुळं शेतकऱ्यांना कापूस विक्रीचा निर्णय घेण्यास मदत होते.

तसंच वायद्यांमधील दराचा परिणाम बाजारावर काही प्रमाणात का होईल होत असतो. वायदे सुरु झाल्यास दरात क्विंटलमागं ३०० रुपयांपर्यंत फरक दिसू शकतो, असं काही गुंतवणुकदार सांगतात. पण वायदेबंदीमुळं कापूस दरावर काहीसा परिणाम झाला.

Cotton Market
Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकरी उरतले रस्त्यावर!

पुढील काळात काय घडू शकतं?

सध्या कापसाला अनेक देशांमधून मागणी कमी असल्याचंही सांगितल जातं. या सर्व घटकांमुळं सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. पण कापसाचे दर वाढण्याचाही अंदाज आहे.

पुढील काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती सुरळीत होईल. त्यामळं कापसाचे भाव सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना यंदा ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विकल्यास फायदेशीर ठरेल, असंही बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घटक

१) इंग्रजी नववर्ष आणि चीनच्या वर्षामुळे सुट्ट्या

२) चीनमध्ये लुनार उत्सामुळे बाजारात कमी व्यवहार

३) मोठ्या कंपन्यांमध्ये सुट्टयांचा काळ असतो

४) आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठे व्यापारी, ब्रोकर्स, खेरदीदार सुट्ट्यांवर असतात

५) आर्थिक वर्ष संपलेल्या देशांमधील कंपन्यांचं नवीन वर्षातील गुंतवणुकीचे धोरण ठरत

६) बाजारात या काळात नफावसुलीही मोठ्या प्रमाणात होत असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com