कापसाचे दर किती घसरले?

जागतिक महागाईमुळे अनेक वस्तुंची मागणी हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दरही नरमले. २०२२ मधील उच्चांकी दराच्या तुलनेत कापूस आणि हळदीच्या दरात मोठी घसरण झाली.
कापसाचे दर किती घसरले?
CottonAgrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर नरमले

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर (Edible Oil Rate) सध्या मागील सहा महिन्यांतील निचांकी पातळीवर आले आहेत. त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर (Global Edible Oil Rate) टनामागे ३०० डाॅलरने कमी झाले. या दर कमी होण्याला तीन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे युक्रेनमधून सूर्यफुल तेलाची (Sunflower Oil) रस्तेमार्गाने सुरु झाली निर्यात. दुसरे म्हणजे इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील बंदी मागे घेतली. त्यामुळे पुरवठा वाढला. तिसरे आणि महत्वाचे म्हणजे इंडोनेशिया आणि मलेशियात लागवड वाढल्याने उत्पादन उच्चांकी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर टनामागे ३०० डाॅलरने कमी झाले. याचा फायदा भारतातील ग्राहकांना होऊ शकतो. तर महागाईला तोंड देत असलेल्या सरकारलाही यातून दिलासा मिळेल, असे जाणकारांनी सांगितले.

मोहरी खेरदीची सरकारला गरजच पडली नाही

जागतिक पातळीवर चालू हंगामात खाद्यतेलाची टंचाई जाणवली. त्यामुळे खाद्यतेलाचे दर तेजीत होते. परिणामी तेलबियांनाही चांगला दर मिळाला. देशात सोयाबीन आणि मोहरी ही दोन महत्वाची तेलबिया पिके आहेत. यंदाच्या हंगामात सोयाबीनसह मोहरीचाही दर तेजीत आहे. मोहरीला यंदा सरकारने ५२०० रुपयांचा हमीभाव जाहिर केला. परंतु सध्या मोहरीला ६ हजार ते ६२०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारात मोहरीची विक्री करत आहेत. परिणामी सरकारला यंदा हमीभावाने खरेदी करण्याची गरज पडली नाही.

मागील आर्थिक वर्षात ७२ लाख टन गव्हाची निर्यात

चालू हंगामात वाढलेल्या उष्णतेमुळे गहू उत्पादनाला फटका बसला. त्यामुळे केंद्राने मे महिन्यात गहू निर्यातीवर बंदी आणली. परंतु गहू निर्यातबंदी होण्याआधी देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात झाली. मागील आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात देशातून विक्रमी गहू निर्यात झाली. मागील वर्षात देशातून ७२ लाख ३९ हजार टन निर्यात झाल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. विविध बंदरांवरून झालेल्या निर्यातीच्या आधारे ही माहिती देण्यात आली. देशातून एवढा गहू निर्यात झाल्यामुळे बाजारात दर हमीभावापेक्षा अधिक आहेत. याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत आल्याचे जाणकारांनी सांगितले.

गव्हासोबतच तांदळाचेही दर वाढण्याची शक्यता

जगात सध्या गव्हाचे दर (Wheat Price) वाढलेले आहेत. त्यामुळे अनेक देश तांदळाचा (Rice) वापर वाढविण्याची शक्यता आहे. कारण आहारात गव्हाचा पर्याय म्हणून अनेक देशांत तांदळाचा वापर केल जातो. त्यामुळे तांदळाचे दरही (Rice Price) वाढू शकतात, अशी शक्यता आता व्यक्त होत आहे. जगात नुकत्याच संपलेल्या हंगामात ५१३ दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन झाले होते. त्यापैकी जागतिक निर्यात केवळ ५२.६ दशलक्ष टनांवर झाली. म्हणजेच एकूण उत्पादनाच्या केवळ १०.३ टक्के निर्यात झाली. भारत वगळता अनेक देशांनी आपली अन्नसुरक्षा लक्षात घेऊन निर्यातीवर बंधने आणली किंवा दर वाढवले. त्यामुळे जागतिक बाजारात पुढील काळात तांदळाचेही दर वाढू शकतात, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

कापसाचे दर किती घसरले?

जगातील महत्वाच्या अर्थव्यस्थांना सध्या महागाईच्या झळा बसत आहेत. काही अर्थतज्ज्ञ तर जागतिक अर्थव्यस्था मंदीच्या सावटात असल्याचे सांगत आहेत. महागाईमुळे वस्तुंची मागणी हळूहळू कमी होऊ लागली आहे. परिणामी अनेक वस्तुंच्या किमती कमी होत आहेत. यात शेतीमालांचाही समावेश आहे. २०२१ च्या प्रारंभापासूनच शेतीमालांचे दर नवनवीन विक्रम करत होते. कापूस, सोयाबीन ही पिके यात आघाडीवर होती. मात्र आर्थिक संकटामुळे शेतीमालाेच दर नरमले. केवळ २०२२ चाच विचार केला तर उच्चांकी दरावरून शेतीमलाचे दर ६ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी झाले. २१ जूनला कापूस उच्चांकी दरापासून (Cotton Rate) ७.१३ टक्क्यांनी नरमला.

सध्या कापसाला ४६ हजार ५७० रुपये प्रतिगाठी दर मिळत आहे. एक कापूस गाठ १७० किलोची असते. सरकी पेंडेचे दर २३ टक्क्यांनी कमी झाले. यात सर्वांत मोठी घसरण ही हळदीच्या (Turmeric) दरात झाली आहे. हळदीचे दर उच्चांकी दराच्या तुलनेत सध्या ३१ टक्क्यांनी नरमले. हळदीचे दर ११ हजार १४८ रुपयांवरून ७ हजार ७३६ रुपयांपर्यंत नरमले. वायदे सुरु असलेले हे दोन पीक महाष्ट्रासाठी महत्वाची आहेत. तर जीऱ्याचे दर साडेदहा टक्के, एरंडी सव्वासहा टक्के आणि मेथी १७ टक्क्यांनी घसरले. कापड उद्योगाकडून मागणी घटल्याने कापसाचे दर नरमले. सध्या शेतकऱ्यांकडे नगण्य कापूस असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com