Soybean Market : आठवडाभरात कसा राहीला सोयाबीन बाजार?

देशातील सोयाबीन बाजारात या आठवड्यात घट पाहायला मिळाली. सोमवारी देशातील सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) चढ उतार सुरु असले तरी दरपातळी वाढली आहे. मात्र देशातील बाजारात सोयाबीनचे दर (Soybean Market Rate) दबावात आले.

चालू आठवड्यात देशातील सोयाबीन क्विंटलमागं २०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळं दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी सोयाबीनचे वायदे १४.९६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर सुरु झाले होते. रुपयात हा दर ४ हजार ४७८ रुपये प्रतिक्विंटल होतो.

त्यानंतर दरात आठवडाभर चढ उतार राहीले. गुरुवारी दरानं या आठवड्यातील उच्चांकी दराचा टप्पा गाठला होता. त्यानंतर शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १५.१२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर (Soybean Future Market) बंद झाले.

रुपयात हा भाव ४ हजार ५६१ रुपये होतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) सोयाबीनचे दर ८३ रुपयाने वाढले. तर सोयापेंडचे वायदे ४७४ रुपयांवर बंद झाले.

देशातील सोयाबीन बाजारात या आठवड्यात घट पाहायला मिळाली. सोमवारी देशातील सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती.

मात्र बुधवारपासून सोयाबीन दरात जास्त नरमाई येत गेली. शनिवारी देशातील सोयाबीनचा सरासरी भाव ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांवर होता. म्हणजेच सोयाबीनचे दर या आठवड्यात क्विंटलमागं २०० रुपयाने कमी झाले.

कशाचा दबाव?

देशातील बाजारात सध्या सोयाबीनवर खाद्यतेल आणि आवकेचा दबाव असल्याचं सांगितलं जातं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव वाढले.

त्यामुळं देशातून सोयापेंड निर्यात वाढली आहे. सोयापेंड निर्यातीची गती कायम राहण्याचा अंदाजही आहे.

तसेच पुढील महिन्यापासून खाद्यतेल आयातही कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं देशातील सोयाबीन दर वाढीसाठी पोषक स्थिती असल्याचं सांगितलं जातं.

Soybean Market
#Shorts : सोयाबीन बाजार दबावातच | ॲग्रोवन

दर वाढीचा अंदाज कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड (Soymeal) तेजीत आहे. तसचं देशातून सोयापेंड निर्यातही वाढत आहे. त्यामुळं सोयाबीन दर वाढणं गरजेचं आहे. पण सध्या तसं दिसतं नाही.

पण पुढील काळात सोयाबीन दर सुधारु शकतात. यंदा सोयाबीनची भावपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

सध्या दर दबावात असल्यानं शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी थांबण्यास हरकत नाही, असंही बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com