Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले

देशातील बाजारात सोयाबीनची आवक आता हळूहळू वाढत आहे. त्यातच मागील आठवडाभरापासून सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पाऊस नाही. त्यामुळे सोयाबीनमधील ओलावा कमी होण्यास मदत होत आहे.
Soybean
SoybeanAgrowon

पुणेः देशातील बाजारात सोयाबीनची आवक (Soybean Arrival) आता हळूहळू वाढत आहे. त्यातच मागील आठवडाभरापासून सोयाबीन उत्पादक (Soybean Production) पट्ट्यात पाऊस नाही. त्यामुळे सोयाबीनमधील ओलावा कमी होण्यास मदत होत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या (International Soybean Market) दरात काहीशी सुधारणा झाली होती.

राज्यात मागील आठवडाभरापासून पावसानं उघडीप दिली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळातही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला वेग दिला. मराठवाडा, विदर्भ आणि इतर इतर सोयाबीन उत्पादक भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसानं पिकाची गुणवत्ता कमी झाली. त्यामुळे शेतकरी मळणी करून लगेच सोयाबीन विक्रीला प्राधान्य देताना दिसत आहेत. चांगल्या गुणवत्तेचं सोयाबीन शेतकरी मागे ठेवत आहेत. चालू आठवड्यात अनेक बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांनी शिवार खरेदीतच सोयाबीन विकली.

Soybean
Rabi Crop Management : कोरडवाहू ज्वारी, हरभरा लागवडीचे नियोजन

सध्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याने या मालाला प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपयांपासून ४ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. तर दुसरीकडे ऊन वाढल्याने शेतकरी सोयाबीन वाळवत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यापासून बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाणं कमी राहील, असं शेतकरी आणि व्यापारीही सांगत आहेत. तर सध्या विक्रीला येत असलेल्या सोयाबीनमध्ये जास्त ओलावा असलेल्या सोयाबीनचं प्रमाण हळूहळू कमी होतंय. त्यामुळे बाजारतील किमान दरही काहीसे सुधारलेले दिसतात.

तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज काहीशी सुधारणा झालेली दिसली. सोयाबीनच्या दराने १४ डाॅलरचा टप्पा गाठला होता. आज सोयाबीनचे डिसेंबरचे वायदे १४०० सेंट प्रतिबुशेल्सने पार पडले. मागील दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर प्रतिबुशेल्स १३ ते १४ डाॅलरच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर सुधारल्यास देशातील बाजारालाही आधार मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

देशातील बाजारात सोयाबीनचा किमान दर काहीसा वाढला आहे. तर एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. सध्याची मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com