Green Chili Market : कळमना बाजारात हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा

वाळलेल्या मिरचीचे दर १२००० ते १८००० रुपये क्विंटल याप्रमाणे स्थिर असताना कळमना बाजारात या आठवड्यात हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा अनुभवण्यात आली.
Green Chili Rate
Green Chili RateAgrowon

नागपूर : वाळलेल्या मिरचीचे दर (Chili Rate) १२००० ते १८००० रुपये क्विंटल याप्रमाणे स्थिर असताना कळमना बाजारात (Kalamana APMC) या आठवड्यात हिरव्या मिरचीच्या दरात (Green Chili Rate) सुधारणा अनुभवण्यात आली. गेल्या आठवड्यात हिरव्या मिरचीचे दर २००० ते २२०० रुपये होते. या आठवड्यात हे दर २५०० ते ३००० रुपये क्विंटलवर पोहोचले, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Green Chili Rate
Chili Market : पावसामुळे यंदा लाल मिरचीचे भाव वधारले

कळमना बाजार समितीत वाळलेल्या मिरचीची आवक गेल्या आठवड्यात ५७९ क्विंटल होती. या आठवड्यात ती ५०८ क्विंटल वर पोहोचली. आवक कमी जास्त होत असताना वाळलेल्या मिरचीचे दर मात्र १२००० ते १८००० रुपयांवर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

हिरव्या मिरचीची आवक गेल्या आठवड्यात ४०० क्विंटल होती. या आठवड्यात आवक कमी होऊन २२० क्विंटलवर आल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच मिरचीच्या दरात सुधारणा अनुभवण्यात आली आहे.

Green Chili Rate
Chili Pest : किडीच्या प्रादुर्भावाने मिरचीचे पीक खराब

गेल्या आठवड्यात हिरव्या मिरचीचे दर १८०० ते २००० रुपये होते. या आठवड्यात हिरव्या मिरचीला २५०० ते ३००० रुपये दर मिळाला. बाजारात ढोबळ्या मिरचीची नियमित आवक असून ती ३५० क्विंटल होती.

या आठवड्यात ती कमी होऊन ८० क्विंटलपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ढोबळी मिरचीला १८०० ते २००० रुपये दर मिळत असताना या आठवड्यात या मिरचीचे दर २२०० ते २५०० रुपयांवर पोहोचले.

कोथिंबीर दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात घट अनुभवली गेली. गेल्या आठवड्यात १५०० ते ३००० रुपये याप्रमाणे कोथिंबीरचे व्यवहार झाले. या आठवड्यात मात्र कोथिंबीरला १००० ते २५०० दर मिळाला.

कोथिंबीरची आवक २२० क्विंटल आहे. दुधी भोपळा १००० ते १३०० रुपये क्विंटलप्रमाणे विकला गेला. याची आवक २५० क्विंटल होती. बाजारात कारल्याची आवक १५ क्विंटलपर्यंत खाली आली आहे.

गेल्या आठवड्यात ही आवक दोनशे क्विंटलच्या घरात होती. त्यामुळेच गेल्या आठवड्यात कारले अवघे ५०० ते १००० रुपये क्विंटल असताना या आठवड्यात कारल्याचे दर ५००० ते ५५०० रुपयांवर पोहोचले आहेत. काकडीची आवक १५० क्विंटल आहे. १५०० ते १७०० रुपयांनी व्यवहार झाले. गाजर आवक ९०० क्विंटल असून १३००-१५०० दर मिळाला.

भुसार बाजारात सोयाबीनची ८५५ क्विंटल आवक

बाजारात गव्हाची नियमित आवक असून ती २०० क्विंटलच्या घरात आहे. ३१०० ते ३३०० याप्रमाणे गव्हाचे व्यवहार झाले. तांदूळ आवक १५० क्विंटल तर दर ४७०० ते ५००० रुपये असा होता. हरभरा आवक ५९ क्विंटल झाली.

४२५० ते ४५०० याप्रमाणे हरभऱ्याचे व्यवहार झाले. तुरीला ६२२१ ते ७४०१ असा दर मिळत ८५ क्विंटल आवक नोंदवली गेली. बाजारात सोयाबीनची नियमित आवक असून ती या आठवड्यात ८५५ क्विंटल इतकी होती. ४४५० ते ५४५० असा दर सोयाबीनला मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com