Onion Rate : उन्हाळ कांद्याला दराचा टेकू

वातावरणीय बदलामुळे रब्बी कांदा हंगाम अडचणीत सापडला होता. एकरी उत्पादन खर्च पाऊण लाखांवर पोहोचला; मात्र काढणी अवस्थेत बुरशीजन्य रोग व तापमानामुळे एकरी उत्पादन घटले.
Onion Rate
Onion RateAgrowon

नाशिक : वातावरणीय बदलामुळे (Climate Change) रब्बी कांदा हंगाम (Rabi Onion Season) अडचणीत सापडला होता. एकरी उत्पादन खर्च पाऊण लाखांवर पोहोचला; मात्र काढणी अवस्थेत बुरशीजन्य रोग व तापमानामुळे एकरी उत्पादन (Onion Production) घटले. ‘कांद्याला ना आकार ना प्रतवारी’ अशीच स्थिती होती. त्यातच साठवणुकीदरम्यान टिकवणक्षमता संपुष्टात आल्याने नुकसान (Onion Crop Damage) वाढले. गेले पाच महिने उन्हाळ कांदा उत्पादन (Summer Onion Production) खर्चाखालीच विकल्याची परिस्थिती होती; मात्र दीड महिन्यापासून ५० टक्क्यांवर सड वाढल्याने आवक कमी होत असल्याने बाजारात कांद्याच्या दराला टेकू मिळाला आहे.

राज्यात प्रमुख उन्हाळ कांदा उत्पादक असलेल्या नाशिक जिल्ह्यात सरासरी दराने २००० रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला; मात्र क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची सुधारणा दिसून आली. चालू वर्षी शेतकरी उत्पादकता व दराच्याबाबतीत कोंडी झाल्याने बेजार झाला आहे. कांदा काढणीपासून ते सप्टेंबरअखेरपर्यंत दरात अपेक्षित सुधारणा झालीच नाही.

Onion Rate
Onion Rate : कांदा, लसूण उत्पादक तोट्यात

आता साठवलेल्या कांद्याची ५० टक्क्यांवर सड होऊन आवक घटल्याने दर सुधारत आहेत; मात्र अखेरच्या टप्प्यात वाढलेले दर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी काहीही लाभदायक नसल्याची स्थिती आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने उन्हाळ कांदा अखेरचा टप्प्यात भाव खाऊ लागला आहे. राज्यात प्रामुख्याने होणारी आवक नाशिक विभागातच होत असल्याचे बाजारातील चित्र आहे.

अडचणीत उत्पादन घेऊन साठवलेल्या उन्हाळ कांद्याला दराची प्रतीक्षा कायम होती. अशातच साठा संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे दसऱ्याच्या मुहूर्तापासून सुरू होणारी खरीप लाल कांद्याची आवक अद्याप नगण्य आहे. त्यामुळे मागणी वाढून पुरवठा घटण्याच्या पार्श्वभूमीवर दर सुधारले आहेत. ऑक्टोबरमध्ये आवक कमी होत असल्याने दरात सुधारणा झाली आहे. ती कायम राहील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Onion Rate
Onion Rate : उमराणेत लिलावात खरीप कांद्याला मुहूर्ताचा दर ११,१११

दर सुधारण्याची काही कारणे:

- नवीन खरीप लाल कांद्याचे अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसान झाल्याने बाजारात होणारी आवक नगण्य.

- आवक सुरू मात्र मागणीनुसार तुलनेत पुरवठा कमी.

- उन्हाळ कांद्याच्या प्रतवारीत घसरण; आवकेत घट.

- देशातील इतर खरीप उत्पादक कांद्याचा पट्ट्यात पावसामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे हंगाम प्रभावित.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सरासरी दर स्थिती :

बाजार समिती..ऑक्टोबर सुरू...१४ ऑक्टोबरअखेर... क्विंटलमागे झालेली वाढ

लासलगाव...१,५०२...१,९६०...४५८

पिंपळगाव बसवंत...१,५५०....२,२००...६५०

उमराणे...१,२००...१,५००...३००

कळवण...१,५७५...१,९०१ ...३२६

सटाणा...१,३२५...१,७००...३७५

नामपूर...१,२५०...१९००...७५०

सिन्नर...१,३७५...१८००....४२५

मनमाड...१,२००...१,८००...६००

चांदवड...१,२८०...१,६८०....४००

आहेत. अल्वर (राजस्थान) व गोंडल (गुजरात) येथील हंगाम काहीसा लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याने पुरवठा संतुलित होणार नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत उन्हाळ कांदा दरात सुधारणा राहील. खरे तर शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक कामकाज केल्याने कांदा टिकला. त्यामुळे दराच्या अनुषंगाने काहीसे समाधान आहे; मात्र उत्पन्नवाढीसाठी तशी परिस्थिती नाही.
मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक.
वर्षभर भांडवल गुंतवून त्यात चालू वर्षी मोठा फटका राहिला. कांदा साठवला मात्र त्यात सर घट आल्याने अपेक्षित माल हाती आलेला नाही. आता बाजारात सुधारणा दिसून येत असली तरी त्यातून फारसे साधेल, असे काही चित्र नाही. थोडीफार उत्पादन खर्च निघण्यात मदत होईल एवढेच.
पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com