हिंगोलीमध्ये भूईमूग शेंगा प्रतिक्विंटल ५५०० ते ६००५ रुपये

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील उन्हाळी भुईमूग शेंगा (वाळलेल्या) आवक सुरू झाली आहे. शनिवारी (ता. २१) भुईमूग शेंगांची ४०० क्विंटल आवक होती.
Groundnuts
GroundnutsAgrowon

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील उन्हाळी भुईमूग शेंगा (वाळलेल्या) आवक सुरू झाली आहे. शनिवारी (ता. २१) भुईमूग शेंगांची ४०० क्विंटल आवक होती. भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल किमान ५५०० ते कमाल ६००५ रुपये, तर सरासरी ५७५२ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवार (ता. १७) ते शनिवार (ता. २१) या कालावधीत भुईमूग शेंगाची १४२० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ५४०० ते कमाल ६००५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २०) भुईमूग शेंगाची २९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५६०० ते कमाल ६१५० रुपये तर सरासरी ५८७५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. १९) भुईमूग शेंगाची ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५७०० ते कमाल ६२०० रुपये, तर सरासरी ५९५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १८) भुईमूग शेंगाची १५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५४०० ते कमाल ५८६० रुपये, तर सरासरी ५६३० रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. १७) भुईमूग शेंगाची २८० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५६०० ते कमाल ६२५० रुपये, तर सरासरी ५९२५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com