Onion Rate : सोलापुरात कांद्याला प्रतिक्विंटलचा सर्वाधिक दर पोचला चार हजारावर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक तुलनेने कमीच राहिली.
onion
onionagrowon

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार (Solapur APMC) समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक तुलनेने कमीच (Onion Rate) राहिली. पण मागणी असल्याने दरात सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४००० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज १०० ते २०० गाड्यांपर्यंत राहिली. गेल्या सप्ताहात दिवाळीमध्ये आवकेत काहीशी घट झाली. पण त्यात सातत्य राहिले, शिवाय मागणीच्या प्रमाणात आवक नसल्याने दरातही सुधारणा झाली. कांद्याची सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला.

onion
Crop Damage Survey : साहेब, पंचनाम्यासाठी पीक पाण्यात ठेऊ का?

या आधीच्या सप्ताहातही प्रतिक्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर काहीसे टिकून राहिले. त्याशिवाय हिरवी मिरची, वांगी, दोडका यांच्या दरातील तेजीही पुन्हा टिकून राहिली. वांगी आणि हिरव्या मिरचीची आवक रोज प्रत्येकी २० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. तर दोडक्याची आवक १० ते १५ क्विंटलपर्यंत राहिली.

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, वांग्याला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ७००० रुपये आणि दोडक्याला किमान ७०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला.

डाळिंबाचे दर टिकून

गतसप्ताहात डाळिंबाचे दर पुन्हा एकदा टिकून राहिले. डाळिंबाची आवक मात्र जेमतेमच राहिली. रोज प्रत्येकी ५०० ते ८०० क्विंटलपर्यंतच आवक राहिली. पण मागणी असल्याने दर टिकून होते. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक १६ हजार रुपये असा दर मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com