Vegetable Market : नाशिकमध्ये वालपापडी घेवड्याची आवकेत वाढ;दरात घसरण

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वालपापडी-घेवड्याची आवक ६८११ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३,००० ते ४,००० असा तर सरासरी दर ३,५०० रुपये राहिला.
Market Committee
Market CommitteeAgrowon

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Market Committee) वालपापडी-घेवड्याची आवक ६८११ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३,००० ते ४,००० असा तर सरासरी दर ३,५०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल किमान ३,५०० ते कमाल ४,५०० तर सरासरी दर ४,००० रुपये राहिला. आवकेत वाढ झाल्याने दरात दरात घसरण दिसून आली.

Market Committee
Orange Market : संत्री दर दबावात

सप्ताहात भाजीपाला व पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव काहीसे कमी झाल्याचे दिसून आले. आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले. हिरवी मिरचीची आवक ६३५ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,००० ते ४,००० रुपये तर सरासरी दर ३,५०० रुपये मिळाला. गाजराची आवक २,२६१ क्विंटल झाली.

त्यास प्रतिक्विंटल २,००० ते ३,५०० तर सरासरी दर २,७०० रुपये राहिला. कांद्याची आवक १४,३८६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २,३५० तर सरासरी दर १,८८० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७,४८१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,३०० ते १,७५० तर सरासरी दर १,५५० रुपये राहिला.लसणाची आवक १५६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,५०० ते ७,८०० तर सरासरी दर ६,००० रुपये राहिला. आद्रकची आवक १२९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४,००० ते ७,००० तर सरासरी दर ६,१०० रुपये राहिला.

Market Committee
Onion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर

फळभाज्यामध्ये टोमॅटोला ५० ते १५० तर  सरासरी १००, वांगी २५० ते ५०० तर सरासरी ३५०, फ्लॉवर ७० ते २४० सरासरी १३० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ६० ते १४० तर सरासरी १०० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.

ढोबळी मिरचीला २५० ते ४०० तर सरासरी दर ३५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २० ते १२५ तर सरासरी ६०, गिलके १०० ते १७५ तर सरासरी १५०, दोडका १७५ ते २५० तर सरासरी दर २२५ रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले.

Market Committee
Jalgaon Milk Association : दूध संघ निवडणुकीत नियमांची पायमल्ली

फळांमध्ये केळीची आवक १,५३२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १,६०० तर सरासरी दर १,२०० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ३,२४२ क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते १२,००० तर सरासरी ८,५०० रुपये दर मिळाला.

भाजीपाला(प्रती १०० जुड्यांचा दर)

पालेभाजी किमान कमाल सरासरी

गावठी कोथिंबीर ६०० ३,८०० १,७००

हायब्रीड कोथिंबीर २०० १४०० ७००

मेथी २,५०० ९,४०० ४,४००

शेपु १,३०० २,२०० १,६००

कांदापात ३,००० ४,१०० ३,५५०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com