
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik APMC) वालपापडी-घेवड्याची आवक ७,७६८ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल २,००० ते ३,००० असा तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,०५० ते ३,२०० तर सरासरी दर २६२५ रुपये राहिला. आवकेत वाढ झाल्याने दरात दरात काहीशी घसरण दिसून आली.
सप्ताहात भाजीपाला व पालेभाज्यांची आवक (Vegetable Arrival) वाढल्याने बाजारभाव काहीसे कमी झाल्याचे दिसून आले. आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले.हिरवी मिरचीची आवक ९५१ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,००० ते ३,००० रुपये तर सरासरी दर २,४५० रुपये मिळाला. गाजराची आवक ८४१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,००० तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला.
उन्हाळ कांद्याची आवक ६,०२६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १,५५१ तर सरासरी दर १,२५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५९२५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,१५० ते १,८५० तर सरासरी दर १,५५० रुपये राहिला. लसणाची आवक ३०२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,८०० ते ८,००० तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला.आद्रकची आवक १०१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६,४०० ते ७,००० तर सरासरी दर ६,८०० रुपये राहिला. फळभाज्यामध्ये टोमॅटोला ४० ते २०० तर सरासरी १२०, वांगी २०० ते ४०० तर सरासरी ३००, फ्लॉवर ३० ते ५० सरासरी ४० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ४० ते ८० तर सरासरी ६० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.
ढोबळी मिरचीला १५० ते २५० तर सरासरी दर २०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ३० ते ५० तर सरासरी ४३,गिलके १५० ते २४० तर सरासरी २००, दोडका ३०० ते ७०० तर सरासरी दर ५०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १,०१२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १,६०० तर सरासरी दर १,२०० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक १,१५० क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते ७,००० तर सरासरी ५,००० रुपये दर मिळाला.
भाजीपाला प्रती १०० जुड्यांचा दर
पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी
कोथिंबीर...८००...२,२००...१,५००
मेथी...५००...१,५००...९००
शेपू...१,२००...२,६५०...१,८००
कांदापात...२,०००...४,६५०...३,०००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.