Jaggery Market : हंगामाच्या शेवटी गूळ दरात वाढ

Jaggery Rate : यंदा हंगामाच्या शेवटी शेवटी गुळाच्या दरात वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गुळाच्या दरात क्‍विंटलला २०० ते ३०० रुपयांनी वाढ होत आहे.
Jaggery Market KOlhapur
Jaggery Market KOlhapurAgrowon

Kolhapur Jaggery Market : यंदा हंगामाच्या शेवटी शेवटी गुळाच्या दरात (Jaggery Rate) वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गुळाच्या दरात क्‍विंटलला २०० ते ३०० रुपयांनी वाढ होत आहे. सध्या गुळाची आवक (Jaggery Arrival) मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे दरात वाढ होत असल्याचे गूळ उद्योगातून सांगण्यात आले.

ऊस हंगाम जवळ जवळ संपला आहे. शिवारात गुळासाठी ऊस शिल्लक नसल्याने गुऱ्हाळे ही जलदगतीने बंद होत आहेत. याचा परिणाम गूळ निर्मितीवरही होत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात गुळाची आवक मंदावली आहे. कोल्हापूर बाजार समितीत गुळास दर्जानुसार ३९०० ते ४२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

Jaggery Market KOlhapur
Jaggery market : पिवळा गुळ आरोग्यासाठी चांगला असतो का?

कोल्हापूर बाजार समितीत गुळाचे सौदे एक दिवसाआड होत आहेत. हंगामामध्ये चार ते पाच तास गुळाचे सौदे चालायचे.

आता केवळ एक ते दोन तासांतच आलेल्या सर्व गुळाचे सौदे होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रानी सांगितले. बाजार समितीत पाच ते सात हजार गूळ रवे येत आहेत.

ही आवक दैनंदिन नसून एक दिवसा आडची आहे. दररोज सौदे होत नसल्याने उत्पादक ही सौदे होणाऱ्या दिवशीच गूळ बाजारात पाठवत आहेत. गेल्या वर्षी वर्षभर हंगाम सुरू राहिला होता.

यंदा मात्र पुरेसा ऊस शिवारात नसल्याने गेल्या वर्षा इतका नियमित हंगाम सुरू राहणार नसल्याची शक्यता आहे. होळीपर्यंत गुळाची दैनंदिन आवक होती. होळीला परप्रांतीय मजूर गावी परतल्यानंतर गूळ निर्मिती थंडावली.

Jaggery Market KOlhapur
Jaggery producer : गूळ उत्पादकांसाठी कोल्हापुरात प्रोत्साहन प्रशिक्षण

राज्यातील गुळाला गुजरात येथील बाजारपेठेचा मुख्य आधार आहे.कोल्हापूर बाजार समितीतून ही थेट गूळ गुजरात ला जातो.

सध्या गुळाची आवक कमी असली तरी गुजरात मधून मागणीत थोडीशी वाढ आहे. फेब्रुवारी पर्यंत गुजरातचे व्यापारी आवश्यक इतकाच गूळ खरेदी करत होते.

मात्र सध्य स्‍थिती पाहता पुढील काळात गूळ कमी प्रमाणात तयार होण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी काही प्रमाणात खरेदी वाढवली. या मुळे पुढील हंगामा पर्यंत तरी दर चांगले राहतील अशी शक्यता गूळ उद्योगाची आहे.

Jaggery Market KOlhapur
Jaggery Market : अंतिम टप्प्यात गूळ दरात वाढ; आवक निम्म्यावर

कर्नाटकी गुळाची आवक नाहीच

डिसेंबरमध्ये कर्नाटकच्या गुळाचे वरून बाजार समितीत मोठा वाद झाला होता. त्यानंतर बाजार समितीने कर्नाटक गुळाच्या आवकेस प्रतिबंध घातला होता.

बाहेरून गूळ येत नसल्याने साहजिकच कोल्हापूर बाजार समितीतील गुळाच्या आवकेवर याचा विपरीत परिणाम झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील गुळाची आवक घटली आहे.

यामुळे नियमित सौदे काढता येत नसल्याचे एक दिवसाआड सौदे निघत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. कर्नाटकातील गुऱ्हाळे वर्षभर सुरू असतात. पण यंदा हा गूळ कोल्हापूर बाजार समितीत येण्याची शक्यता कमी आहे.

कोल्हापूर बाजार समितीतील गूळ दर (ता. २४ मार्च) (प्रतिक्विंटल रुपये, कमाल - किमान)

दर्जा...दर

स्पेशल ४२५० - ४२५०

१ ४१०० - ४२४०

२ ३९००- ४०९०

३ ३६०० - ३८९०

४ ३४०० - ३५४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com