Sugar : साखरेच्या विक्रीत शंभर लाख टनांनी वाढ

देशात गेल्या वीस वर्षांत साखरेची विक्री तब्बल शंभर लाख टनांनी वाढली आहे. २०००-२००१ या साखर हंगामामध्ये देशांतर्गत साखरेचा खप १६२ लाख टन होता. २०२०-२१ मध्ये २६५ लाख टन साखर देशांतर्गत बाजारात विकली गेली.
Sugar Export
Sugar Export Agrowon

कोल्हापूर : देशात गेल्या वीस वर्षांत साखरेची विक्री (Sugar Sale) तब्बल शंभर लाख टनांनी वाढली आहे. २०००-२००१ या साखर हंगामामध्ये देशांतर्गत साखरेचा खप (Domestic Sugar Sale) १६२ लाख टन होता. २०२०-२१ मध्ये २६५ लाख टन साखर देशांतर्गत बाजारात विकली गेली. घरगुती ग्राहकांपेक्षा औद्योगिक ग्राहकांमध्ये वाढ झाल्याने साखरेच्या मागणीमध्ये (Sugar Demand) गेल्या दहा वर्षांत वाढ दिसून आली आहे. प्रत्येक वर्षी साखरेच्या उत्पादनात चढ-उतार होत असले तरी विक्रीमध्ये मात्र प्रत्येक वर्षाला वाढ झाली आहे.

Sugar Export
Sugar Export : महाराष्ट्राला यंदाही साखरनिर्यातीची सर्वाधिक संधी

देशात ५०० हून अधिक साखर कारखाने दरवर्षी उसाचा गाळप हंगाम घेतात. साखरेचे उत्पादन वाढत असले तरी कारखान्यांची संख्या मात्र फारशी वाढलेली नाही. अनेक कारखान्यांनी दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ केल्याने साखरेचे उत्पादन वाढत गेले. या कारखान्यांमधून तयार होणारी ६० ते ७० टक्के साखर औद्योगिक वापरासाठी जाते. तर उर्वरित साखरेची किरकोळ ग्राहकांना विक्री होते.

Sugar Export
Sugar Export : महाराष्ट्राला यंदाही साखरनिर्यातीची सर्वाधिक संधी

गेल्या २० वर्षांत शीतपेये, आइस्क्रीम, चॉकलेट उद्योगात मोठी वाढ झाली. यामुळे साखरेची मागणी सातत्याने वाढत राहिली. कंपन्यांनी देशात बहुतांश ठिकाणी आपले प्लांट टाकले व स्थानिक ठिकाणांहून साखरेची खरेदी केली. याबरोबरच मिठाई उद्योगानेही साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात नोंदविली. त्यामुळे साखरेचा खप हा वाढताच राहिला. २००७-८ पासून साखरेच्या विक्रीने २०० लाख टन साखर विक्रीचा टप्पा ओलांडला. यानंतर प्रत्येक वर्षी १० ते २० लाख टनांनी विक्रीवाढ होत गेली. २०२०-२१ मध्ये २६५ लाख टन साखर देशात विकली गेली.

गेल्या वीस वर्षांतील साखरेच्या उत्पादनावर नजर टाकल्यास प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादनात चढ-उतार दिसून आले आहेत. २००१-२००२ ते २०१५-१६ पर्यंत प्रत्येक वर्षी ऊस उत्पादनात घट दिसून आली. या कालावधीपर्यंत १५० ते २०० लाख टन साखरेची प्रत्येक वर्षी विक्री झाली.

२०१७- १८ पासून उत्पादनात सातत्य आहे. या हंगामापासून ते गेल्या हंगामापर्यंत (२०२१-२२) साखर उत्पादनाचा आकडा ३०० लाख टना पेक्षा जास्त झाला आहे. या तीन वर्षांत निर्यातीचा आलेख ही चढता राहिला. २०१८-१९ ला ३८, २०१९-२० ला ५६, २०२०-२१ ला ८१ लाख टन साखर निर्यात झाली. या वर्षीपर्यंत तर हा आकडा १०० लाख टनांपर्यंत गेला. स्थानिक बाजारात साखर कमी पडू नये म्हणून केंद्राने निर्यातीवर अंकुश ठेवला आहे. यंदाही देशात तीन महिने पुरेल इतकी साखर यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी असेल, असे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com