Rice Prices: देशभरात तांदळाच्या किंमतीत वाढ

देशभरात तांदळांच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तांदळाच्या दरात १० -१५ टक्के वाढ झाली आहे.
Rice Export
Rice ExportAgrowon

देशभरात तांदळांच्या किंमतींमध्ये (Rice Price At India) वाढ झाली आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तांदळाच्या दरात (Rice Rate In Bengol) १० -१५ टक्के वाढ झाली आहे. गव्हाचा तुटवडा (Rice Shortage), बांगलादेशात तांदूळ उत्पादनात (Rice Production) झालेली मोठी घट, बांगलादेशातून वाढलेली मागणी (Demand Of Rice) यामुळे भारतीय तांदळाचा भाव वधारला आहे.

स्वर्ण जातीच्या तांदळाच्या किंमतीत प्रति क्विंटल २०० रूपयांची वाढ झाली असून प्रीमियम मिनीकेट तांदळाच्या किंमतीत जवळपास ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

Rice Export
Rice Procurement: एफसीआयला आढळली तेलंगणाच्या तांदूळ खरेदीत खोट?

पण तांदळाची बाजारपेठ तापायला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? तर बांगलादेशने मागच्या महिन्यात तांदळावरील आयातशुल्क ६२.५ टक्क्यांवरुन २५ टक्क्यांपर्यंत खाली आणलं. भारत लवकरच तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालेल, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे बांगलादेशने घाई करत जून-अखेरपासूनच तांदळाची आयात सुरू केली.

Rice Export
Rice Export : केंद्र सरकार तांदूळ निर्यातबंदी करेल का?

भारतातून एवढ्या लवकर तांदूळ आयात करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. एरवी बांगलादेश सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये तांदूळ आयात करायला सुरू करतो. त्यात आता बांगलादेशानेही सर्व प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असल्यामुळे बाजारपेठ आणखीनच तापली.

डायरेक्टर-जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सने दिलेल्या अहवालानुसार, भारताने 2021-22 मध्ये १६.२३ लाख टन बिगर बासमती तांदळाची बांगलादेशला निर्यात केली. त्यातून भारताला ४५४१ कोटी रूपये मिळाले. त्या आधीच्या वर्षी निर्यात ९.११ लाख टन होती. म्हणजे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत तब्बल ७८ टक्के वाढ झाली. बांगलादेश सर्वसाधारणपणे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तांदूळ खरेदी करतो.

प्रतिकूल हवामान

यावर्षी पुरामुळे बांगलादेशातील भातशेतीचं मोठं नुकसान झालं. पूर, वादळ आणि अतिवृष्टीमुळे भाताचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलं. त्यात आणि गव्हाची उपलब्धताही कमी असल्यामुळे तांदळाच्या मागणीत वाढ झाल्याचं दिसलं.

भारतातील भातशेती मॉन्सूनवर अवलंबून आहे. जूनमध्ये अनेक राज्यांत पावसानं दडी मारल्यामुळे भातपेरणी पुढं गेली. यामुळे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गव्हाचा कित्ता गिरवत तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घातली जाईल, अशी जोरदार चर्चा बाजारात सुरू आहे. त्यामुळे खरेदीदारांनी घाबरून तांदळाची खरेदी वाढवली आहे. या सगळ्यामुळे तांदळाचा भाव वधारला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com