Cotton Market : कापूस, तुरीच्या दरात वाढ; हळदीमध्ये घसरण

कापसाचे फ्यूचर्स व्यवहार व हेजिंग करणाऱ्या शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ही आता चांगली सोय झाली आहे. त्यामुळे त्यांना निश्‍चित व अधिक भाव मिळू शकतील.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Agriculture Commodity Market सोमवार १३ फेब्रुवारी २०२३ पासून MCX मध्ये पुन्हा कापसाचे फ्यूचर्स (Cotton Future Market) व्यवहार सुरू झाले आहेत. सध्या ते एप्रिल २०२३ व जून २०२३ व ऑगस्ट २०२३ डिलिव्हरीसाठी आहेत.

किमतीचे परिमाण मात्र यापुढील व्यवहारात बदलेले असेल. किमती दर कॅण्डीसाठी (Cotton Candy) (खंडी) असतील. (एक कॅण्डी म्हणजे ३५५.५६ किलो किंवा जवळ जवळ २.०८ गाठी). डिलिव्हरी युनिट ४८ कॅण्डीचे (१०० गाठी) असेल.

(४८ कॅण्डी म्हणजे प्रत्येकी १७०.६७ किलोच्या १०० गाठी). स्टेपल लांबी २९ मिमी आहे. मुख्य डिलिव्हरी केंद्र राजकोट असेल; पण अधिकची डिलिव्हरी केंद्रे महाराष्ट्रातील यवतमाळ व जालना असतील.

कापसाचे फ्यूचर्स व्यवहार व हेजिंग करणाऱ्या शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ही आता चांगली सोय झाली आहे. त्यामुळे त्यांना निश्‍चित व अधिक भाव मिळू शकतील.

या सप्ताहापासून या फ्यूचर्स भावांची माहिती देण्यास सुरुवात करीत आहोत. शेतकऱ्यांनी जरी अशा फ्यूचर्स व्यवहारात प्रत्यक्ष भाग घेतला नाही, तरी भविष्यातील किमतींचा अंदाज येण्यास फ्यूचर्स किमती मदत करतात. फॉरवर्ड डिलिव्हरी करार करण्यासाठीसुद्धा या किमती मार्गदर्शक ठरतात.

१७ फेब्रुवारी रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ०.४ टक्क्याने वाढून प्रति खंडी रु. ६२,७२० वर आले. एप्रिल फ्यूचर्स भाव रु. ६३,२२० वर आले, तर जून फ्यूचर्स रु. ६३,८६० वर आले.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ०.१ टक्क्याने घसरून रु १,५७९ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत. सध्याचे बाजार भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. कापसाची आवक अजून वाढती आहे.

मका

NCDEX मधील मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा, सांगली) जानेवरी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,१०८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने घसरून रु. २,१०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (मार्च डिलिव्हरी) किमती रु. २,११३ वर आल्या आहेत.

मे फ्यूचर्स किमती रु. २,१३७ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. मक्याची आवक नरमली आहे.

Cotton Market
Turmeric Harvesting : हळदीचे पीक काढणीसाठी तयार

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निझाजामाबाद, सांगली) किमती जानेवारी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ७,१३१ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ६,९९० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ६,९४८ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ७,०३० वर आल्या आहेत. आवक हळूहळू वाढत आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,६५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. आवक गेल्या दोन आठवड्यांपासून वाढू लागली आहे.

Cotton Market
Cotton Production : कापूस उत्पादन अंदाजाचे गौडबंगाल

मूग

मुगाच्या स्पॉट किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ७,९०० वर आली होती. या सप्ताहात ती २.५ टक्क्यांनी वाढून रु. ८,१०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती जानेवारी महिन्यात कमी होत होत्या. या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.९ टक्क्याने वाढून रु. ५,६१८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ६.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,३६६ वर आली आहे. तुरीची आवक वाढू लागली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,०५० होती; या सप्ताहात ती घसरून रु. ७५९ वर आली आहे. आवक वाढू लागली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ६२५ वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. ९६७ वर आली आहे. आवक वाढत्या पातळीवर स्थिर आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो)

: arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com