Tur Market : बाजारात तुरीला मिळतोय उठाव

देशातील बाजारात आता नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र पुरवठा साखळीत तुरीचा ठणठणाट आहे. तर देशातील उत्पादनात यंदा मोठी घट आली.
Tur Arrival
Tur ArrivalAgrowon

Tur Market Update पुणे ः देशातील बाजारात आता नव्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढत आहे. मात्र पुरवठा साखळीत तुरीचा ठणठणाट आहे. तर देशातील उत्पादनात यंदा मोठी घट आली. त्यामुळे बाजारात (Tur Market) येणाऱ्या तुरीला लगेच उठाव मिळत आहे.

तर दरही तेजीत आहेत. म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीचेही दर (Tur Rate) जास्त आहेत. त्यामुळे यंदा तुरीचे भाव प्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने आपल्या पहिल्या अंदाजात यंदा देशात जवळपास ३९ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र नुकतेच केंद्रीय खाद्य सचिवांनी यंदा देशातील तूर उत्पादन ३२ ते ३३ लाख टनांच्या दरम्यानच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला. तर बाजारातील व्यापारी आणि जाणकारांच्या मते यंदा देशात ३० लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होणार नाही.

Tur Arrival
Tur Market : तुरीचे दर आवक वाढूनही तेजीतच

देशातील अनेक बाजारांमध्ये आता नव्या तुरीची आवक वाढली आहे. तूर उत्पादनात आघाडीवर असलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आवक सुरू झाली.

व्यापाऱ्यांनी दिलेली माहिती आणि बाजार समित्यांमधील आवकेच्या माहितीवरून, देशात आता जवळपास १३ लाख क्विंटल नवी तूर बाजारात आली आहे.

कर्नाटकातील आवक

देशातील बाजारात विक्री झालेल्या एकूण १३ लाख क्विंटल तुरीपैकी सर्वाधिक माल कर्नाटकातील आहे. कर्नाटकात आत्तापर्यंत जवळपास ८ लाख क्विंटल तूर बाजारात आली. कर्नाटकातील तलिकोट बाजारात सर्वाधिक २ लाख क्विंटलची आवक झाली.

तर मुद्दबिहाल बाजारात १ लाख ७१ हजार, रायचूर १ लाख ५५ हजार, गुलबर्गा १ लाख २१ हजार आणि बिदर बाजारात १ लाख क्विंटल तुरीची आवक झाली होती.

Tur Arrival
Tur Market Rate : उत्पादन घट, मजबूत मागणीमुळे तूर तेजीत राहण्याचा अंदाज

महाराष्ट्रातील तूर आवक

महाराष्ट्रातील बाजारात जवळपास ५ लाख क्विंटल तूर दाखल झाली होती. सोलापूर बाजारात सर्वाधिक १ लाख ३८ हजार क्विंटल तूर आतापर्यंत आली. त्यानंतर जालना बाजारात १ लाख १३ हजार क्विंटल, अकोला ६३ हजार, खामगाव ७६ हजार, लातूर ६१ हजार आणि बार्शी बाजारात ७८ क्विंटल आवक झाली.

दराची स्थिती

देशात यंदा जुन्या तुरीची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग खरेदीत सक्रिय आहे. तर म्यानमारमधून येणाऱ्या तुरीचे भावही सध्या प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांच्या वरच आहेत. त्यामुळे सध्या नव्या तुरीतील ओलावा जास्त असला तरी भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

यंदा देशातील उत्पादनाची स्थिती पाहता तुरची सरासरी दरपातळी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com