Turmeric : देशात हळदीच्या क्षेत्रात ३३ हजार हेक्टरने वाढ

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात अंदाजे ३३ हजार हेक्टरने त्यात वाढ झाली असल्याचा अंदाज हळद संशोधन केंद्राने वर्तविला आहे.
Turmeric
TurmericAgrowon

सांगली ः देशात यंदाच्या हंगामातील हळद लागवड (Turmeric Cultivation) पूर्ण झाली आहे. सुमारे २ लाख ७५ हजार हेक्टरवर हळदीची लागवड (Turmeric) झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात अंदाजे ३३ हजार हेक्टरने त्यात वाढ झाली असल्याचा अंदाज हळद संशोधन केंद्राने (Turmeric Research Center) वर्तविला आहे.

वास्तविक पाहता, प्रत्येक वर्षी देशात २० ते २५ टक्क्यांनी हळदीचे क्षेत्र वाढते. गेल्यावर्षी हळदीच्या दरात फारशी तेजी झाली नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात १५ टक्क्यांनी हळद क्षेत्र वाढले आहे. देशातील हळदीचे निश्चित क्षेत्र डिसेंबर-जानेवारीमध्ये होईल. त्याचवेळी देशात हळदीचे क्षेत्र नेमके कितीने वाढले, याचा अंदाज बांधता येईल, असे मत उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केले.

देशातून हळदी निर्यात मोठ्या प्रमाणात होते. राज्यात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. दोन वर्षापूर्वी हळदीला चांगले दर मिळाले. गतवर्षी हळदीच्या दरात तेजी होती. मात्र, त्यानंतर सोयाबीन दरात वाढ झाली. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळाले. त्यामुळे गतवर्षी हळदीच्या क्षेत्रात १० टक्क्यांनी घट झाली होती. वास्तविक पाहता, हळदीचे दर तेजीत राहतात. त्यामुळे दरवर्षी हळदीच्या क्षेत्रात २० ते २५ टक्‍क्यांनी वाढ होत असल्याचा दावा हळद संशोधन केंद्राने केला आहे. गेल्यावर्षी हळदीचे क्षेत्र २ लाख ४४ हेक्टर इतके होते.

Turmeric
Turmeric : भारतीय हळदीला का वाढतेय मागणी?
Turmeric
Turmeric : हिंगोली जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवर हळद लागवड

यंदाच्या हंगामात हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात मार्च-एप्रिल मध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित पाऊस झाला. परंतु, हळद लागवडीसाठी फारसा वेळ मिळाला नाही. असे असले तरी शेतकरी उपलब्ध पाण्यावर हळदीची लागवड करण्यासाठी पुढे आले होते. हळदीचे दर ६ हजार ते ८ हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात टिकून राहिले.

विदर्भ, मराठवाड्यात वाढतेय हळद

देशातील हळद लागवड क्षेत्रापैकी गतवर्षी राज्यात ८४ हजार ६६ हेक्टरवर लागवड झाली होती. त्यामुळे देशात हळद लागवडीत राज्याने आघाडी घेतली. यंदा राज्यात १ लाख पेक्षा अधिक हेक्टरवर हळदीची लागवड झाली असल्याचा अंदाज आहे. यामुळे यंदाही राज्य हळद लागवडीत अव्वल स्थानी राहिला आहे. वास्तविक पाहता पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भ आणि मराठवाड्यात हळदीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसते आहे.

कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव

हळद लागवड करून अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे. सध्या हे पीक कंद वाढीच्या स्थितीत आहे. मात्र, अतिपावसामुळे हळद पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कंद कूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अतिपावसामुळे शेतात पाणी साचल्याने कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या बुरशीनाशकाचा वापर करून कंदकूज नियंत्रणात येऊ शकते.
डॉ. जितेंद्र कदम, सहयोगी प्राध्यापक, पदव्युत्तर संस्था, रोहा, जि. रायगड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com