Vegetable Market Rate : बहुतांश भाजीपाल्याचे वाढलेले दर कायम

गेल्या आठवड्यात सुमारे १०० ट्रकची झालेली आवक या रविवारी ८० ट्रक झाली होती. आवक घटल्याने बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा, मटारच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती.
Vegetable Market Rate
Vegetable Market RateAgrowon

पुणे ः परतीच्या पावसाचा फटका (Rainfall) पिकांना बसल्याने रविवारी (ता.१६) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) फळभाज्यांची आवक (Fruit Vegetable Arrival) गेल्या आठवड्याच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात घटली. गेल्या आठवड्यात सुमारे १०० ट्रकची झालेली आवक या रविवारी ८० ट्रक झाली होती. आवक घटल्याने बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा, मटारच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. तर, कांद्याचे आणि इतर बहुतांश भाजीपाल्याचे वाढलेले दर कायम होते.

Vegetable Market Rate
Vegetables Rate : नगरला भाजीपाल्याच्या दरात सुधारणा कायम

आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून २ टेम्पो शेवगा, इंदौर येथून २ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून ५ टेम्पो घेवडा, गुजरात येथून ४ टेम्पो भुईमूग शेंगा, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे १३ ट्रक आवक झाली होती.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती, टोमॅटो सुमारे ८ हजार क्रेटस, फ्लॉवर सह तांबडा भोपळा, हिरवी आणि ढोबळी मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, कोबी ८ टेम्पो, गाजर २०० गोणी, मटार ३० ते ४० गोणी, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, कांदा सुमारे ११० ट्रक, आग्रा, इंदौर, स्थानिक भागातून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती.

Vegetable Market Rate
Vegetable Rate: नाशिकमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक वाढल्याने दरात घसरण

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १८०-२२०, बटाटा : २००-२८०. लसूण : १५०-४००, आले : १५०-३५०, भेंडी : २००- ३००, गवार : गावरान व सुरती ३००-६००, टोमॅटो : ३००-४००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २५०-४५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी :२००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १२०-१६०, फ्लॉवर : १६०-२००, कोबी : १२०-१६०, वांगी : ३००-४५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ४००-४५०, बीट : २६०-३००, घेवडा : २५०-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४५०-५००, मटार : स्थानिक: १५००-१८००, पावटा : ५००- ६००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २२०-२५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

मेथी, कोथिंबीर, मुळा, पालकचे भाव तेजीत

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दोन लाख तर मेथीची ४० हजार जुड्यांची आवक झाली होती. आवकेत भिजलल्या पालेभाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने दरांत वाढ झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : १२००-१६००, शेपू : ३००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००- ७००, पुदीना : ३००-७००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१६००, राजगिरा : ४००-८००, चुका : ६००-८००, चवळई : ४००-६००, पालक : ८००-१२००.

पावसाचा फटका फुलांना बसल्याने आवक घटली होती. मात्र मागणी देखील तुलनेने कमी असल्याने दर सरासरी होते.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : २०-४०, अष्टर : जुडी १०-२०, सुट्टा ८०-१००, बिजली : १०-४०, कापरी : १०-२०, शेवंती : २०-५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ४०-८०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-१२०, शेवंती काडी १००-१५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ३००-४००, ग्लडिओ (१० काड्या) : ५०-८०, जुई : ४००-५००.

फळ बाजार

फळ बाजारात रविवारी (ता.१६) लिंबाची सुमारे २ हजार गोणी, डाळिंब ४० टन, पपई १० टेम्पो, चिक्कू ६०० बॉक्स, मोसंबी ६०

टन, संत्रा ३० टन, पेरू सुमारे १ हजार क्रेट, कलिंगड १० तर, खरबूज २ पिकअप, सीताफळ २५ टन आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे

लिंबे (गोणीस) - ४००-७००, डाळिंब (किलो) गणेश - १०-४०, भगवा ५०-२००, आरक्त २०-८०, पपई प्रति किलो -१२-१८, पेरू (२० किलो) -२५०-४००, सीताफळ - २०-१००, कलिंगड २०-२५ खरबूज ३०-४५, मोसंबी ३ डझन १८०-३८०, ४ डझन ८०-१५०. संत्रा (१० किलो) २००-५००.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com