Fruit Market : नगरला सीताफळ, संत्र्यांची आवक वाढली

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यापासून सीताफळ, संत्र्यांची आवक वाढली आहे.
Market Committee
Market Committee Agrowon

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Market Committee) मागील आठवड्यापासून सीताफळ, संत्र्यांची (Orange) आवक वाढली आहे. येथे दररोज पाचशे क्विंटलपर्यंत फळाची आवक (Fruit Arrival) झाली. भाजीपाल्याची आवक (Vegetable Arrival) स्थिर असून दरात चढउतार पाहायला मिळाला.

Market Committee
Jalgaon Milk Association : दूध संघ निवडणुकीत नियमांची पायमल्ली

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यापासून सीताफळाची दररोज १७० क्विंटलपर्यंत आवक आहे. सिताफळाला १ हजार ते ७ हजार, मोसंबीची ५० क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत प्रती क्विंटल दर मिळत आहे. संत्राच्या १४० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते ५ हजार, डाळिंबाची ३५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते १५ हजार, पेरूची ११ क्विंटलपर्यंत आवक होऊन पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

भाजीपाल्यात टोमॅटोची दररोज ११० क्विंटलपर्यंत आवक होत असून ६०० ते दीड हजार रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळत आहे. वांगीची ३३ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ४ हजार, फ्लॉवरची ४८ क्विटंलपर्यत आवक होऊन १ हजार ते ३ हजार, कोबीची ७० क्विटंलपर्यत आवक होऊन ७०० ते १५००, काकडीची ४५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ७०० ते १९००, गवारची १० क्विंटलपर्यंत आवक होऊन ३ हजार ते ७ हजार ५००, घोसाळ्याची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते ३५००, दोडक्याची ६ क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते ३ हजार ५००, कारल्याची ११ क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते साडेतीन हजार,

Market Committee
Agri Commodity MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर | ॲग्रोवन

भेंडीची २८ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ४ हजार, वाल शेंगाची ११ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, घेवड्याची ४ क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते साडेतीन हजार, बटाट्याची ३९० क्विंटलपर्यंत आवक होऊन १७०० ते २३००, हिरव्या मिरचीची ८७ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ४५००,

Market Committee
Crop Damage Compensation : सिंदखेडराजात चार मंडलातील शेतकरी मदतीपासून वंचित

शेवग्याची ७ क्विंटलपर्यंत आवक होऊन ६००० ते ८ हजार, शिमला मिरचीची २८ क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. पालक, शेपू, कोथिंबीर, मेथी, चवळी, मुळा, वाटाना, डांगर, कांदापात याची आवक जेमतेम असून दरात चढउतार सुरु होता.

सोयाबीनची आवक घटली

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची मागील पंधरा दिवसात अडीच हजार क्विंटलपर्यंत आवक होत होती. ही आवक आता दर दिवसाला दीड हजारावर आली आहे. सध्या सोयाबीनला ४ हजार ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र हा दरही हमी दरापेक्षा कमीच आहे. सोयाबीन दरात वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com