Guava Cultivation : डाळिंब, द्राक्षाऐवजी शेतकऱ्यांचा वाढला पेरूकडे कल

सांगली ः जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
Guava Cultivation
Guava CultivationAgrowon

Sangali Guava Cultivation : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अतिवृष्टी, परतीचा पाऊस (Rainfall) आणि नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकरी (Grape Pomegranate Farmer) मेटाकुटीला आला आहे. परिणामी या पिकांची नव्याने लागवड करण्यासाठी उत्साही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यायी पीक म्हणून पेरू लागवडीकडे (Guava Cultivation) शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी २४७ हेक्टरवर पेरूची लागवड होती. २०२१-२०२२ मध्ये ६३१ हेक्टरवर झाली आहे. अर्थात, तीन वर्षांत ३८४ हेक्टरने पेरूच्या लागवडीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत द्राक्ष आणि डाळिंब पिकाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसले. दुष्काळी पट्ट्यात या दोन्ही पिकांना टँकरने पाणी घालून जगविले. त्यातून शेतकरी आर्थिक प्रगतिपथावर पोहोचू लागला.

Guava Cultivation
Guava Cake : पुरंदर पेरूचा केक बाजारात

द्राक्ष, डाळिंबाची निर्यात होण्यास सुरुवात झाली. गेल्या चार वर्षांपासून द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे परकीय चलन इथे येऊ लागले. आटपाडी तालुक्यासह अन्य तालुक्यांतील डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले. युरोप देशासह, बांगलादेशातही डाळिंबाची विक्री सुरू झाली.पान ४ वर

Guava Cultivation
Guava Cultivation : सांगली जिल्ह्यात पेरूच्या क्षेत्रात वाढ

दरम्यान, गेल्या तीन ते चार वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी आणि परतीचा पाऊस या साऱ्याचा फटका या दोन्ही पिकांना बसू लागला. त्यातच डाळिंबावर खोडकिडीचा (पीन होल बोअरर) प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात येऊ लागले. खर्चात वाढ होत असल्याने आर्थिक ताळमेळ बसणे मुश्कील बनले.

जुन्या आणि रोगाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी काढून टाकल्या. परंतु डाळिंब आणि द्राक्षाची नवी लागवड करण्यास शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. या दोन्ही पिकांना पेरू या पिकाचा पर्याय शोधून जिल्‍ह्यात पेरूची लागवड करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत पेरूच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

तालुकानिहाय २०२१-२२ मधील पेरूचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज २२९.१०

वाळवा २२.९४

शिराळा ५

तासगाव ३५.६०

खानापूर २१

पलूस ३०

तालुका क्षेत्र

कडेगाव १४

आटपाडी ८३.४०

जत १३९.४०

कवठे महांकाळ ५२

एकूण ६३१.४४

वर्ष पेरूची लागवड (हेक्टरमध्ये)

२०१९-२० २४७.८५

२०२०-२०२१ ६२२

२०२१-२२ ६३१.४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com