सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची उघडीप

आंबा, काजू बागायतदारांची खतांसाठी धांदल
Rain
RainAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः पावसाने उघडीप (Rain Intensity) दिल्यामुळे जिल्ह्यातील बागायतदारांनी आंबा (Mango), काजू (Cashew) या फळझाडांना खते (Fertilizer) देण्यास सुरुवात केली असून बागांमध्ये बागायतदारांची धांदल सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Rain
Kharip Sowing News: पुणे विभागात खरिपाच्या ६५ टक्के पेरण्या

जिल्ह्यात आंबा आणि काजू या दोन फळपिकांखाली साधारणपणे १ लाख हेक्टर क्षेत्र आहे. काजू पिकाखाली ७२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. आंबा, काजुला बागायतदार आपापल्या पद्धतीने खते देतात. कुणी मिश्रखते तर कुणी सरळ खते देतात. काही शेतकरी जूनमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर खते देतात तर काही बागायतदार ऑगस्टमध्ये पाऊस कमी झाल्यानंतर खते देतात. अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अशी दोन टप्प्यात विभागून खते घालतात.

Rain
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

यावर्षी पावसाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस पावसामध्ये सातत्य नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी झाडांना खते देण्याचे टाळले. त्यानंतर १ जुलै ते १५ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या कालावधीत खते देणे शक्य नव्हते. गेले चार पाच दिवस पावसाने उघडीप दिली आहे. कधीतरी हलक्या सरी पडत आहेत. हे वातावरण खते देण्यासाठी अनुकूल असल्यामुळे बहुतांश आंबा, काजू बागायतदारांनी खते घालण्यास प्रारंभ केला आहे.

देवगड, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ या तालुक्यांमध्ये आंबा लागवड मोठ्या प्रमाणात आहे. येथील बागायतदारांनी आंबा बागांना खते देण्यासोबतच इतर व्यवस्थापनाला सुरुवात केली आहे. तर उर्वरित जिल्ह्यात काजू पिकांची लागवड अधिक आहे. या भागातील शेतकऱ्यांचीदेखील काजू बागांमध्ये लगबग दिसून येत आहे. पावसाचा जोर वाढत नाही तोपर्यंत बागायतदारांना हे काम करता येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com