Jaggery Market : कोल्हापुरात गूळ सौदे पूर्ववत

मजुरीवाढीच्या मुद्द्यांवरून बाजार समितीत बंद पडलेले गूळ सौदे शनिवारी पूर्ववत झाले. एका दिवसात सव्वा लाख गूळ रव्यांचे सौदे झाले.
Jaggery Market
Jaggery MarketAgrowon

कोल्हापूर : मजुरीवाढीच्या (Wage) मुद्द्यांवरून बाजार समितीत(Jaggery Market) बंद पडलेले गूळ सौदे शनिवारी पूर्ववत झाले. एका दिवसात सव्वा लाख गूळ रव्यांचे सौदे झाले. यार्डातील माथाडी कामगारांनी ५० टक्के मजुरीवाढीच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी काम बंद आंदोलन केले.

Jaggery Market
Jaggery Market : ‘सौदे बंद’चा पोरखेळ थांबवा

त्यानंतर बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी कक्षात झालेल्या बैठकीत माथाडीत कामगारांनी अवास्तव मागणी करू नये, तसेच सौदे सुरू ठेवून माथाडी मजुरीवाढीबाबत चर्चा करावी, अशा सूचना दिल्या होत्या. तरीही काम बंद आंदोलनावर माथाडी ठाम होते.

अशा स्थितीत व्यापारी, अडते व शेतकरी यांनी गुरुवारी संयुक्त बैठक घेऊन खासगी मजूर आणून सौदे काढण्याचा शुक्रवारी (ता. ७) प्रयत्न केला. मात्र त्यालाही फारसे यश आले नव्हते. बाजार समितीने शेतकरी, व्यापारी यांच्या आर्थिक नुकसानीबाबत जबाबदार का धरू नये? अशा आशयाची नोटीस बजावली होती.

Jaggery Market
Healthy jaggery : गूळ खाण्याचे फायदे काय आहेत?

त्यानंतर माथाडींनी शुक्रवारी सायंकाळी निबंधक यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आपण जितकी मजुरीवाढ द्याल ती मंजूर असेल, असे मान्य करून काम करण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार मार्केट यार्डात शनिवारी गूळ सौदे सुरू झाले.

बाजारपेठेत दीड लाख गूळ रव्यांची आवक आहे. यात शिल्लक गूळ रवे ६० हजार होते. असे सर्व मिळून एक किलो ते ३० किलो गूळ रव्यांचे सौदे निघाले. सरासरी २८०० ते ३८०० रुपयांचा भाव मिळाला. बंद आंदोलनापूर्वी सौदे झालेल्या जवळपास सर्व एक लाख रव्यांची वाहतूक ठप्प होती.

चार दिवस १६ ट्रक थांबून होते. माथाडी कामगार कामावर आल्याने गुळाची भरणी, उतरणी, तोलाई, पॅकिंग काम सुरू झाले. तीन ट्रक रवाना झाले. येत्या दोन दिवसांत उर्वरित गूळ रवेही बाहेरच्या बाजारपेठेकडे पाठवणे सुरू होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com