Jaggery Market : कर्नाटकचा गूळ सांगलीत; दर टिकून

कर्नाटकात गुळाचा हंगाम सुरु झाला आहे. सांगलीतील बाजार समितीत गूळ विक्रीसाठी येऊ लागला आहे. दररोज ५ हजार ते ६ हजार क्विंटलपर्यंत गुळाची आवक होत आहे.
Jaggery Market | Jaggery season
Jaggery Market | Jaggery seasonAgrowon

Sangli : कर्नाटकात गुळाचा हंगाम (Jaggery season) सुरु झाला आहे. सांगलीतील बाजार समितीत गूळ (Sangali Jaggery Market) विक्रीसाठी येऊ लागला आहे. दररोज ५ हजार ते ६ हजार क्विंटलपर्यंत गुळाची आवक (Jaggery Arrival) होत आहे. दिवाळीनंतर गुळाचे दर (Jaggery Rate) टिकून आहेत. गुळाला सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. यंदाच्या हंगामात गुळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.

Jaggery Market | Jaggery season
Jaggery Market : कोल्हापुरात गूळ सौदे बंदच

सांगली बाजार समितीत वर्षभर गुळाची आवक होत असून सौदे निघतात. या बाजार समितीत कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुळाची आवक होते. कर्नाटकात सध्या गूळ निर्मिती सुरु झाली आहे. त्यामुळे आवकही वाढली आहे. वास्तविक पाहता, सध्या सर्वच भागांतील बाजार समित्यांमध्ये गुळाची आवक सुरु असल्याने सांगलीतील बाजार समितीत गुळाच्या आवकेत काही प्रमाणात घट झाली आहे.

Jaggery Market | Jaggery season
Natural Jaggery : नैसर्गिक पद्धतीच्या गुळाचा ‘राशी’ ब्रॅण्ड

सांगली बाजार समितीत दररोज ५ ते ६ हजार क्विंटल गुळाची आवक होत आहे. दरही टिकून आहेत. सांगली बाजार समितीत गुळाची आवक मार्च महिन्यापासून अधिक होत असते. त्यामुळे स्पर्धेतून दरीही चढे मिळतात. बाजार समितीत पाव किलोपासून ते ३० किलोपर्यंत अशा विविध प्रकारचे पॅकिंग असलेल्या गुळाची आवक होते.

चिक्की गुळास मोठी मागणी

सध्या चिक्की गुळास मोठी मागणी आहे. चिक्की गुळास ३६०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. मुंबईसह राजस्थान, गुजरात या ठिकाणांहून त्यास मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

सांगली बाजार समितीतील गुळाची आवक, दर स्थिती

तारीख...आवक (क्विंटल)...किमान...कमाल...सरासरी (रुपयांत)

१५ डिसेंबर ...४६८६...३१५०..३९६०...३५५५

१४ डिसेंबर...६०३३...३१५०३८९०...३५२५

१३ डिसेंबर...४६२०...३१५०...४०३१...३५९१

१२ डिसेंबर ..४७८७...३१५०..३८००..३४७५

गुळाचा हंगाम सुरु झाला असला तरी, गुळाची आवक तशी कमीच आहे. मार्च महिन्यात हंगाम मोठ्या प्रमाणात सुरु होईल. सध्या गुळाचे दर टिकून आहेत. चिक्की गुळास चांगली मागणी आहे.
अमरसिंह देसाई, गूळ व्यापारी, सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com