Jaggery Market : अंतिम टप्प्यात गूळ दरात वाढ; आवक निम्म्यावर

गुळ हंगामाच्या अंतिम टप्प्यात गुळाच्या दरात क्विंटलला २०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाबरोबरच गुळ हंगामही शेवटच्या टप्प्यात आला आहे.
Jaggery Market
Jaggery MarketAgrowon

Jaggery Market Kolhapur ः गुळ हंगामाच्या (Jaggery Season) अंतिम टप्प्यात गुळाच्या दरात (Jaggery Rate) क्विंटलला २०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाबरोबरच गुळ हंगामही शेवटच्या टप्प्यात आला आहे. हंगाम संपत आल्याने व उसाची कमतरता असल्याने गुळाची (Jaggery Shortage) चणचण लक्षात घेता व्यापारी गूळ खरेदीला (Jaggery Procurement) प्राधान्य देत आहेत.

परिणामी दरात वाढ होत असल्याचे व्यापारी व बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यामध्ये गुळाची आवक निम्म्यावर आली आहे.

Jaggery Market
Jaggery Powder : गूळ पावडर कशी तयार केली जाते?

बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून गुळाची आवक मंदावली आहे. बाजार समितीत दररोज आठ ते दहा हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. बहुतांशी गुऱ्हाळघरे बंद होत आहेत. यामुळे दिवसेंदिवस बाजार समितीत गुळाची आवक कमी होत आहे.

यंदा गूळ उत्पादक तालुक्यातील ऊस हंगाम किमान पंधरा दिवस आधी संपणार आहे. स्थानिक भागातील ऊस संपला असून आता गुराळघर मालक अन्य तालुक्यांतून उसाची खरेदी करून गुळ तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Jaggery Market
Jaggery producer : गूळ उत्पादकांसाठी कोल्हापुरात प्रोत्साहन प्रशिक्षण

गेल्या वर्षी मे पर्यंत गुळ हंगाम वेगात सुरू होता. यंदा मात्र उसाचा उतारा कमी असल्याने उसाची तोडणी जलद झाली. गुऱ्हाळासाठी ऊस झपाट्याने तुटला. सध्या गुऱ्हाळसाठी फारसा ऊस शिल्लक नसल्याचे चित्र विशेष करून करवीर, राधानगरी गगनबावडा तालुक्यांत आहे. गुळासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या उसाच्या किमतीतही वाढ झाली आहे.

गेल्या महिन्यापर्यंत २७०० रुपये टनापर्यंत गुळ तयार करण्यासाठी उसाची खरेदी केली जात होती. या दरात आता ५०० ते १००० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी उसाची फारशी चणचण जाणवली नव्हती. यंदा मात्र गुळ तयार करण्यासाठी गुऱ्हाळ मालकाला जास्त कष्ट द्यावे लागत आहेत.

परप्रांतीय मजूर गावी परतले

होळीच्या पार्श्वभूमीवर गुऱ्हाळ घरावर काम करणारे परप्रांतीय मजूर आपापल्या भागात परतले आहेत. यामुळे गुळ तयार करण्याची प्रक्रिया संथ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ५० टक्क्यांहून अधिक मजूर गुराळघरावर काम करतात.

सध्या स्थानिक मजुराच्या साह्यानेच गूळ निर्मिती सुरू आहे. गुळाची आवक घटण्याचे हेही एक प्रमुख कारण असल्याचे गुऱ्हाळघर सूत्रांनी सांगितले

हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गुऱ्हाळघरे बंद होत आहेत. यामुळे गुळाची आवक गेल्या महिन्याच्या तुलनेत निम्म्यावर आली आहे. आवक कमी झाल्याने साहजिकच गुळाच्या दरात वाढ झाली आहे.

- के. बी. पाटील, गूळ विभाग प्रमुख, कोल्हापूर बाजार समिती.

कोल्हापूर बाजार समितीतील शनिवारचे (ता. ४) गूळ दर (रुपये)

दर्जा...सरासरी (प्रतिक्विंटल)

स्पेशल...४२००

१...४१००

२...३८००

३...३६००

४...३२००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com