Jaggery Market : गूळ उत्पादकांनी रोखले गुळाचे सौदे

गुळाला नीचांकी भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ गुळ उत्पादकांनी मंगळवारी (ता.22) येथील बाजार समितीत सौदे बंद पाडले.
Jaggery Rate
Jaggery RateAgrowon

कोल्हापूर : गुळाला किफायतशीर दर (Jaggery Rate) मिळत नाही, तोवर सौदे (Jaggery Trading) होऊ देणार नाही अशी भूमिका घेत कोल्हापूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी गुळाचे (Kolhapur Jaggery Market) सौदे मंगळवारी (ता. 22) बंद पाडले. व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक बंद व्हावी, कर्नाटकातून होणारी आवक बंद करावी अशा मागण्याही यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.

Jaggery Rate
Jaggery Rate : शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे बंदच राहणार

यावेळी बाजार समितीचे प्रशासक प्रकाश जगताप यांनी गूळ उत्पादकांच्या मागण्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गुळाचे सौदे पुन्हा सुरू करण्यात आले.

Jaggery Rate
Jaggery Market : कोल्हापुरी गुळाच्या बाजारपेठेचा बदलतोय ‘ट्रेण्ड’

बाजार समितीत सकाळी 10 वाजता सौदे सुरू झाले तेव्हा गुळाचे सौदे 3700 रुपयांच्या वर निघाले होते. तर त्याचवेळी काही गुळाचे सौदे मात्र त्यापेक्षाही कमी दरात निघाले. त्यामुळे गूळ उत्पादक संतप्त झाले. त्यातून सौदे बंद करत वाढीव दराची मागणी गूळ उत्पादकांनी केली.

शेतकऱ्यांनी गुळ सौदे प्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने मागण्याची दखल घेतली. गुळाच्या दर घसरणीला कारणीभूत ठरणाऱ्या कर्नाटकमधील गुळाची तपासणी सुरू केली. श्री जगताप, सचिव जयवंत पाटील, के बी पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गूळ उत्पादकाबरोबर बैठक सुरू होती.

गुळाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय

कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ उत्पादक दर घसरल्याने चांगलाच हवालदिल झाला आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याने गुऱ्हाळ घरे बंद करण्याऐवजी गुळाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय गूळ उत्पादकांनी घेतला आहे. कोल्हापूरचा गूळ हा दर्जेदार आणि साखरमिश्रित नसावा, असाही निर्णय घेण्यात आला. बाजार समितीत शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com