Jaggery Market : दिवाळीनंतर मंदावली गुजरातमधील गूळ विक्री

दिवाळीतील मागणीनंतर आता गुजरातमधील गूळविक्री मंदावली आहे. यामुळे सध्या गुळाचा हंगाम सुरू झाला असला तरी गुजरातमधील शीतगृहामध्ये गूळ शिल्लक असून मागणीतही घट झाली आहे.
Jaggery Market
Jaggery MarketAgrowon

कोल्हापूर ः दिवाळीतील मागणीनंतर आता गुजरातमधील गूळविक्री (Jaggery Sale) मंदावली आहे. यामुळे सध्या गुळाचा हंगाम (Jaggery Season) सुरू झाला असला तरी गुजरातमधील शीतगृहामध्ये गूळ शिल्लक (Jaggery In Cold Storage) असून मागणीतही घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये पावसाच्या तडाख्यानंतर थांबलेला गूळ हंगाम सध्या वेगाने सुरू झाला आहे. आवकेत वाढ असली तरी गेल्या महिन्याच्या तुलनेत दराबाबतीत मात्र फारसे समाधानकारक चित्र नसल्याची स्थिती आहे. कोल्हापूर बाजार समितीत मागणी रोडावल्याने दरात काहीअंशी घसरण झाली आहे.

Jaggery Market
Jaggery Production : बोरीपार्धीत गुऱ्हाळावर छापा

यंदा दसरा-दिवाळीच्या दरम्यान गुळाला मागणी चांगली राहिली. यामुळे दिवाळीच्या दरम्यान गुळाचे दर चांगले होते. या वेळी गुजरातमधील व्यापाऱ्यांनी सातत्याने गुळाची मागणी नोंदवली. गुऱ्हाळे कमी प्रमाणात सुरू असल्याने गुळाची निर्मितीही माफक होती. मागणीत वाढ असल्याने साहजिकच गुळाचे दर क्विंटलला ४३०० रुपयांपर्यंत गेले होते.

Jaggery Market
Jaggery Rate : गूळ सौद्यात प्रति क्विंटल ३३०० ते ५१०० रुपये दर

साधारणपणे दिवाळी होईपर्यंत दरवाढीचा हा ट्रेंड कायम राहिला. दिवाळीनंतर मात्र गुळाची मागणी कमी राहिली. शीतगृहात गूळ शिल्लक रहात असल्याने व्यापाऱ्यांनी गूळ खरेदीला फारसे प्राधान्य दिले नाही. उलट परिस्थिती कोल्हापूर बाजार समितीत राहिली. ऑक्टोबरच्या पूर्वार्धात गूळ पट्ट्याला झोडपून काढणारा पाऊस दिवाळीच्या दरम्यान पूर्णपणे थांबला.

उसाचे प्लॉट गतीने वाफशाला आले यामुळे गूळनिर्मितीही वेगाने सुरू झाली. कोल्हापूर बाजार समितीत ऑक्टोबरमध्ये ३४०० ते ४३०० रुपयांपर्यंत दर होते. नोव्हेंबरच्या मध्याला हे दर ३२०० ते ४१०० रुपयांपर्यंत आले. सध्या फक्त स्पेशल गुळाला ४३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

पण बाजार समितीत येणारा जास्तीत जास्त गूळ हा एक ते चार क्रमांकाचा असल्याने ३२०० शेती ४१०० रुपयांपर्यंतच बहुतांश प्रमाणात दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. सध्या बाजार समितीत २० हजार रव्यापर्यंत गुळाची आवक सुरू आहे. इथून पुढील काळात गुळाची आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.

कोल्हापूर बाजार समितीत दर्जानुसार गुळाचे दर (प्रति क्विंटल रुपये)

प्रत किमान कमाल सरासरी

स्पेशल ४३०० ४३०० ४३००

नं. १ ४१०० ४२०० ४१५०

नं. २ ३८०० ४०५० ३९००

नं. ३ ३४५० ३७९९ ३५००

न. ४ ३१०० ३४०० ३२९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com