Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. यंदा सातत्याने पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पेरणीला फारशी गती नव्हती.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

सांगली ः जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी (Kharif Sowing) अंतिम टप्प्यात आली आहे. या आठवड्यात खरिपाची पेरणी (Sowing) पूर्ण होईल. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ३३ हजार ५१८ हेक्टरवर म्हणजे ९१ टक्के पेरणी झाली असून, सर्वाधिक पेरा मका पिकाचा (Maize Sowing) झाला आहे. पलुस तालुक्यात सर्वांत कमी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या (Department Of Agriculture) सूत्रांनी दिली.

Kharif Sowing
Cotton Sowing: अतिसघन कापूस लागवड तंत्र कसं आहे ?

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. यंदा सातत्याने पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पेरणीला फारशी गती नव्हती. परिणामी, पेरणीचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता फारशी दिसत नव्हती. परंतु पेरणीच्या दरम्यान, पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी नियोजन करत पेरणी साध्य केली. शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भात पिकाची प्रामुख्याने पेरणी केली जाते. सुरुवातीच्या टप्प्यात भात पिकाची पेरणी झाली. त्यानंतर जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा काठच्या भागात आगाप सोयाबीन पिकाची पेरणी उरकली. त्यानंतर हळूहळू जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकरी पेरणी करण्यासाठी पुढे आले. परंतु यंदा पाऊस वेळेत सुरू झाला नसल्याने दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली होती.

Kharif Sowing
Kharif Sowing : पुणे विभागात १०३ टक्के पेरणी

दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करून पेरणी पूर्ण केली. परंतु त्यानंतर पावसाचा खंड पडल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यानंतर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात तूर, बाजरी आणि ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मका पीक घेतले जाते. गेल्या दोन वर्षांत मका पिकाच्या क्षेत्रात घट झाली होती; मात्र यंदा मकाच्या क्षेत्रात वाढ होईल, अशी शक्यता आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका....क्षेत्र

मिरज...२२९३५

जत..७३२१०

खानापूर...१०३९१

वाळवा...२२८१५

तासगाव...३०२४९

शिराळा...२२६४४

आटपाडी...१०६३३

कवठे महांकाळ...१९२७४

पलूस...५९१०

कडेगाव...१५४१४

एकूण...२ लाख ३३ हजार ५१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com