Tomato : खरीप टोमॅटो हंगाम अतिवृष्टीने प्रभावित

जिल्ह्यात सिन्नर, नाशिक, दिंडोरी व निफाड तालुक्यांत खरीप हंगामातील टोमॅटोचे क्षेत्र अधिक असते. मात्र चालू वर्षी सततच्या पावसामुळे कामे वेळेवर करता आलेली नाहीत.
Tomato
TomatoAgrowon

नाशिक : जिल्ह्यात सिन्नर, नाशिक, दिंडोरी व निफाड तालुक्यांत खरीप हंगामातील टोमॅटोचे (Kharif Tomato Crop) क्षेत्र अधिक असते. मात्र चालू वर्षी सततच्या पावसामुळे (Continues Rain) कामे वेळेवर करता आलेली नाहीत. तर झालेल्या लागवडीत नुकसान (Tomato Crop Damage) वाढते आहे. लागवडीत करपा, फुलगळ यामुळे नुकसान (Tomato Disease) वाढत आहे. तर शेतात पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी रोपांची मर झाली आहे. त्यामुळे टोमॅटो हंगाम (Tomato Season Affected) प्रभावित झाला आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी १० ते ११ हजार हेक्टरवर लागवडी होत असतात. त्यापैकी पूर्व भागात येवला, निफाड व चांदवड तालुक्यांत मेअखेर व जून महिन्यात काही आगाप लागवडी होतात. मात्र तापमान वाढ व सततच्या पावसामुळे करप्याच्या तडाख्यात नुकसान वाढते राहिले. तर नंतरच्या टप्प्यात जुलै महिन्यात नियमित खरिपाच्या लागवडी अधिक असतात. मात्र सतत २० दिवस सुरू असलेल्या पावसामुळे लागवडी करताना अडचणी आल्या. प्रामुख्याने पांढुर्ली (सिन्नर), गिरणारे (नाशिक), पिंपळनारे, वणी, दिंडोरी (दिंडोरी) या भागांत खरिपाच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर होतात. मात्र यंदा लागवडी होत असल्या तरी त्यामध्ये खंड पडला. त्यामुळे त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला.

Tomato
Tomato : टोमॅटो खरेदीत ३४ शेतकऱ्यांची ३१ लाखांची फसवणूक

२५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान पावसाची उघडीप मिळाल्यानंतर सिन्नर, नाशिक, दिंडोरी, निफाड, चांदवड भागांत लागवडी होत गेल्या. मात्र त्या लांबणीवर गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे चालू वर्षी जवळपास दोन आठवडे पुढे लागवडी सुरू राहतील, असा अंदाज आहे.

Tomato
Tomato : टोमॅटोवरील कीड-रोग नियंत्रण

निफाड तालुक्यात पश्‍चिम भागातील काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा काढून टोमॅटो लागवडी केल्याने काही अंशी क्षेत्र वाढत आहे. मात्र पावसामुळे लागवडीचे कामकाज विस्कळित झाले आहे. लागवडीचे क्षेत्र उपळले. अशा ठिकाणच्या लागवडीमध्ये रोपांची मरतूक होण्याची समस्या वाढली आहे. फुलधारणा होत असताना फुलगळ होत असल्याचे स्थिती आहे.

शेतकऱ्यांसमोरील अडचणी...

- आगाप लागवडी करपाजन्य रोगांमुळे खराब

- सततचा पावसामुळे नव्या लागवडीत रोपांची मरतूक

- काही ठिकाणी फुलगळ, फळांवर ठिपके

- लागवडीत पाणी साचून राहिल्याने झाडांच्या मुळ्यांची कार्यक्षमता कमी

- कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे पीक संरक्षण खर्च वाढला

- लागवडी वाढून सुद्धा उत्पादनावर परिणाम

लागवडीची स्थिती :

तालुका..क्षेत्र(हेक्टर)

नाशिक...१,५२७

दिंडोरी...२,१८१

निफाड...२,२२०.८

पेठ...१०१

सिन्नर...३,२१४

येवला...७२२

चांदवड...१,०५१

मालेगाव...१२५

सटाणा...५२

नांदगांव...३८

कळवण...१६२

सुरगाणा...४८

देवळा...१८५

(ता.३ ऑगस्ट अखेर लागवडी

संदर्भ : कृषी विभाग)

चालू हंगामात रोपांना चांगली मागणी राहिली. जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील सिन्नर, नाशिक, दिंडोरी व निफाड तालुक्यांच्या लागवडी अजून पुढील १० दिवस सुरूच राहतील. टोमॅटो लागवडी नियमित आहेत. मात्र त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र पावसामुळे हंगाम अडचणीचा आहे.
मधुकर गवळी, संचालक, ओम गायत्री नर्सरी, उगाव, ता. निफाड
पावसामुळे लागवडीसाठी मशागत करून बेड करणे, खते टाकणे, प्लॅस्टिक कागद आच्छादन, त्यानंतर फवारण्या अशा कामांना अडथळा आला. पाऊस थांबल्यानंतर ऊन कडक पडल्यास पुन्हा करपा, पांढरी माशी, नागअळी यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
तुषार उगले, सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक
सततचा पावसामुळे पिकांची अन्नद्रव्य घेण्याची कार्यक्षमता मंदावली आहे. त्यामुळे झाडांच्या वाढीच्या अवस्थेत रोगांचा प्रादुर्भाव दिसून लागवडी पिवळ्या पडत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत अडचणी अधिक आहेत.
समाधान शिंदे, टोमॅटो उत्पादक, तळेगाव वणी, ता. दिंडोरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com