Sugar Production : कोल्हापूर विभाग साखर उताऱ्यात आघाडीवर

नोव्हेंबरच्या मध्याला पडलेल्या थंडीने राज्यातील साखर उतारा वाढण्यास मदत झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत राज्याच्या सरासरी उताऱ्यात १ टक्क्याने वाढ झाली आहे. राज्यातील गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

कोल्हापूर : नोव्हेंबरच्या मध्याला पडलेल्या थंडीने (Cold) राज्यातील साखर उतारा (Sugar Recovery) वाढण्यास मदत झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत राज्याच्या सरासरी उताऱ्यात १ टक्क्याने वाढ झाली आहे. राज्यातील गळीत हंगाम (Sugar Crushing Season) सुरू होऊन दीड महिना झाला आहे.

Sugar Production
Sugar Export : गतीने पाच लाख टनांचे साखर निर्यात करार

चार नोव्हेंबरच्या अहवालानुसार, राज्याचा सरासरी साखर उतारा ७.२९ इतका होता. १ डिसेंबरच्या अहवालानुसार सरासरी उतारा ८.७६ टक्के इतका झाला आहे. साखर उताऱ्यात दक्षिण महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. कोल्हापूर विभागाचा (कोल्हापूर, सांगली जिल्हे) सरासरी उतारा १०.१३ टक्के इतका आहे.

उताऱ्याच्या वाढीतही या विभागाने गती पकडली. राज्याच्या अन्य विभागांच्या तुलनेत कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सरासरी दोन ते अडीच टक्क्यांनी वाढत आहे. अमरावतीचा ८.९२, पुण्याचा ८.८३, नांदेडचा ८.५४, तर नगर विभागाचा साखर उतारा ८.३८ टक्के आहे.

Sugar Production
Sugar Factory : शिरपूर साखर कारखाना सुरू होणार

साखर उताऱ्यात वाढ होण्यासाठी थंडीची आवश्यकता असते. नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापासून मध्यापर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढले होते. ऊस क्षेत्रांच्या इतर भागाच्या तुलनेत कोल्हापूर सांगली या कमी थंडी असणाऱ्या प्रदेशांमध्येही पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. अमरावती, नांदेडमध्ये राज्याच्या इतर भागांच्या तुलने थंडीत सातत्य राहिले. याचा अनुकूल परिणाम या विभागातील साखर उतारा वाढण्यावर झाला.

राज्यात १७८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. यापैकी ८९ खासगी, तर ८९ सहकारी आहेत. राज्यात पावसाने बहुतेक ठिकाणी विश्रांती दिल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून गळीत हंगाम विना अडथळा सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत पश्‍चिमेकडील काही भागांत ढगाळ हवामान व पावसाच्या हलक्या सरी झाल्या. मात्र एक -दोन दिवसांचा अडथळा वगळता हंगाम नियमित सुरू असल्याचे या विभागातील कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

नागपूरचा उतारा ५ टक्क्यांपर्यंतच

पश्‍चिम महाराष्ट्रात या वेळी थंडीची सुरुवात चांगली झाली. मात्र केवळ दोन ते तीन दिवसच थंडीची लाट राहिली. त्यानंतर हळूहळू ढगाळ हवामान झाल्याने साखरेच्या उताऱ्यात उच्चांकी वाढ झाली नाही. मात्र ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरच्या संपूर्ण महिन्यांमध्ये हवामान चांगले आहे. त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात साखर उतारा वाढत असल्याचे कारखान्याच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात सर्वांत उशिरा नागपूरचा हंगाम सुरू झाला. नागपूरचा उतारा सध्या केवळ ५ टक्क्यांपर्यंत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com