Urad Production : शेंगा न लागल्याने खानदेशात उडदाचे मोठे क्षेत्र रिकामे

खानदेशात उडदाला फुले व हव्या तशा शेंगा न लागल्याच्या तक्रारी मागील १० दिवसांपासून सुरूच आहेत. अशातच शेंगांमधील दाणेच पक्व होत नसल्याने उडदावर शेतकरी रोटाव्हेटर फिरवीत आहेत.
Urad
Urad Agrowon

जळगाव ः खानदेशात उडदाला फुले व हव्या तशा शेंगा (Urad Pods) न लागल्याच्या तक्रारी मागील १० दिवसांपासून सुरूच आहेत. अशातच शेंगांमधील दाणेच पक्व होत नसल्याने उडदावर शेतकरी रोटाव्हेटर (Urad Crop Demolish By Farmer) फिरवीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभाग (Agriculture Department) मात्र या बाबत अनभिज्ञ आहे.

Urad
Urad Procurement : सरकार आयात उडीद खरेदी करणार

कुठलीही पाहणी, पंचनामे कृषी विभागाने याबाबत केलेली नाही. खानदेशात जळगावात सुमारे १७ हजार हेक्टरवर, धुळ्यात पाच हजार आणि नंदुरबारातही सुमारे चार हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली होती. सुरुवातीला पाऊस बरा होता. यामुळे पीक जोमात होते. नंतर सततच्या पावसाने पिकात तण वाढले. ते कसेबसे शेतकऱ्यांनी नियंत्रित केले. त्यासाठी एकरी चार ते पाच हजार रुपये खर्च लागला. फवारण्या दोनदा घेतल्या. फुले काही भागात लगडत होती. परंतु शेंगांची वाढच हवी तशी झाली नाही. जेथे शेंगा लागल्या, तेथे त्यात दाणेच भरले नाहीत. ही समस्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सांगितली. पण कुणी दखल घेतली नाही. गावोगावी कृषी सहायक व इतर यंत्रणा फिरते, पण त्यांनीदेखील गांभीर्याने या बाबत आवश्यक कार्यवाही केलेली नाही. पिकात कुठलेही उत्पादन दिसत नसल्याने धुळे, जळगाव व नंदुरबारात शेतकरी त्यावर रोटाव्हेटर फिरवीत आहेत. सुमारे पाच ते सात हजार हेक्टरवरील उडदाचे पीक रोटाव्हेटर करून क्षेत्र रिकामे करण्यात आले आहे.

Urad
Urad : यंदा उडीद भाव खाण्याची शक्यता

जळगाव तालुक्यात खेडी खुर्द, वडनगरी, फुपनगरी, ममुराबाद, कडगाव, भादली, आसोदा, सुजदे, विदगाव, धामणगाव, शिंदखेड्यातील मुडावद, तावखेडा, टाकरखेडा, धुळे तालुक्यातील लामकानी, कुसुंबा, तामसवाडी, धनूर शिरपुरातील तऱ्हाडी, बभळाज, तरडी, नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, खोंडामळी, शहाद्यातील पुसनद, जयनगर, मामाचे मोहिदे, तोरखेडा, सारंगखेडा अशा अनेक गावांत उडदाला शेंगा न लागल्याच्या व शेंगांमधील दाणे पक्व न झाल्याच्या तक्रारी आहेत. या भागात पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. कारण मोठा खर्च केला, पण तो वाया गेला. आणखी त्यातच रोटाव्हेटरसाठी नव्याने खर्च करावा लागत आहे. रोटाव्हेटर करून त्यात पुढे आगाप दादर ज्वारी, हरभरा, मका आदी पिके घेण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.

मी माझा सुमारे पाच एकरांतील उडीद रोटाव्हेटर केला आहे. त्याला शेंगाच अत्यल्प लागल्या. पीक हिरवेगार व त्याची चांगली वाढत दिसत आहे. पण शेंगा बारीक, त्यात दाण्यांचा अभाव, अशी समस्या आहे. अशीच समस्या परिसरातील इतर उडीद उत्पादकांसमोर आहे. या बाबत कृषी विभागाने आवश्यक कार्यवाहीच केलेली नाही. पंचनामे व भरपाई मिळावी. -
योगेश चौधरी, शेतकरी, खेडी खुर्द, ता. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com