Onion Procurement : ‘नाफेड’मार्फत लेट खरीप लाल कांदा खरेदी नाशिकमध्ये सुरू

चालू लेट खरीप हंगामातील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदीची सातत्याने मागणी होत होती.
Onion Market
Onion MarketAgrowon

Onion Market Update नाशिक : चालू लेट खरीप हंगामातील कांद्याचे दर (Onion Rate) मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे ‘नाफेड’मार्फत (NAFED) कांदा खरेदीची (Onion Procurement) सातत्याने मागणी होत होती.

या पार्श्‍वभूमीवर केंद्राने नाशिक जिल्ह्यात लेट खरीप कांद्याची खरेदी सुरू केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांत (ता. २७) अखेर नाशिक जिल्ह्यात ३ हजार क्विंटल खरेदी झाल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यःस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किमती विचारात घेता ‘नाफेड’मार्फत लाल कांदा खरेदीप्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी, यासाठी डॉ. पवार यांनी पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले होते.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत योग्य तत्काळ त्या किमतीत कांदा खरेदी सुरू करावी, अशा आशयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते.

आता राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक असलेल्या नाशिक पट्ट्यातील कांद्याच्या घसरलेल्या किमतीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी खरीप कांदा खरेदी सुरू केली आहे. ‘नाफेड’ने जिल्ह्यात मर्यादित केंद्रे सुरू केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Onion Market
Onion Rate : लासलगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

जिल्ह्यात लाल कांद्याची ३ हजार टन जिल्ह्यातील देवळा, सटाणा तालुक्यांत शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत, तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये खुल्या पद्धतीने खरेदी होणार आहे. मात्र मात्र बाजार समितीचे दराप्रमाणेच खरेदी होणार आहे.

कांद्याची टिकवणक्षमता नसल्याने सरकारला तोटा होणार आहे; मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेऊन कामकाज सुरू केल्याचे डॉ. पवार यांनी बोलताना सांगितले.

Onion Market
Onion Rate : नाफेडची कांदा खरेदी सुरू करा; भुजबळांनी केली सभागृहात मागणी

लक्ष्यांक आणि दराबाबत चित्र अस्पष्ट

कांद्याची खरेदी करण्यापूर्वी ‘नाफेड’मार्फत आजवर रब्बी कांद्याचे अनुषंगाने लक्षात जाहीर होऊन कामकाज सुरू होत असे. मात्र लेट खरीप लाल कांद्याचे अनुषंगाने खरेदीचा लक्ष्यांक स्पष्ट झालेल्या नसल्याचे समोर आले आहे.

या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या कार्यालयाचे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्याशी संवाद साधण्यात आला.

मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नेमकी किती खरेदी होईल व किती दिवस होईल याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही.

कांदा निर्यात बंद असल्याबाबत विरोधकांकडून अफवा पसरविल्या जात आहेत. कांदा निर्यात ही खुली आहे. काही देशांकडे पत नसल्याने, त्यांच्याकडून कांदा खरेदी केली जात नाही. परंतु भारताकडून अशी कोणतीही निर्यात बंदी नाही.

- डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com