‘गोकुळ’चे नेते, संचालक घेणार स्वतः म्हशी

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) संचालक संघाच्या दूध उत्पादन वाढीसाठी चक्क स्वतः म्हशी घेऊन त्याचे पालन पोषण करणार आहेत.
Hasan Mushrif
Hasan MushrifAgrowon

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (Gokul) (गोकुळ) संचालक संघाच्या दूध उत्पादन (Milk Production) वाढीसाठी चक्क स्वतः म्हशी घेऊन त्याचे पालन पोषण (Buffalo Rearing) करणार आहेत. आठवड्यापूर्वीच संचालक मंडळाच्या उपस्थितीत दूधवाढीसाठी कार्यशाळा घेतली. त्यामध्ये संचालकांनी व नेत्यांनी प्रत्येकी दोन म्हशी घेतल्या पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेतलीच पाहिजे. शेतकऱ्यांनाही एक म्हैस घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. असा संकल्प करण्यात आला होता. याला तातडीने प्रतिसाद म्हणून माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दोन म्हशी घेऊन या संकल्पाची पूर्तता केली.

Hasan Mushrif
Dairy : ‘आरे’चे दूध वितरण, संकलन बंद

‘‘‘अमूल’सारखा दूध संघ ‘गोकुळ’ला आव्हान ठरत आहे. त्यासाठी दूध उत्पादन वाढ ही महत्त्वाची आहे,’’ असे मुश्रीफ यांनी सांगितले. आता आधीच्या आठ आणि नवीन दोन अशा दहा म्हशी मुश्रीफ यांच्या गोठ्यात आहेत. जिल्ह्याबाहेरील बाजारातून आणलेल्या या दोन म्हशींचे मुश्रीफ यांनी कागलच्या गैबी चौकात स्वागत केले. गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची वरदायिनी आहे. या संघासमोर असलेले अमूल दुधाचे आव्हान ‘गोकुळ’चे दूधउत्पादक शेतकरीच परतवून लावतील,’’ असा विश्‍वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Hasan Mushrif
अगं अगं म्हशी...

मुश्रीफ म्हणाले, की गोकुळ दूध संघाची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात येऊन एक वर्ष झाले. संघाने एक वर्षात केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा आम्ही यापूर्वीच मांडला आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये २० लाख लिटर म्हशीच्या दुधाचे मार्केट उपलब्ध आहे, अशी खात्री आहे. अशातच अमूल दूध संघासारखे फार मोठे आव्हान गोकुळ दूध संघासमोर उभे आहे. त्यामुळेच म्हशीचे दूध वाढविण्यामध्ये यशस्वी झालो, तर गोकुळ दुधाचा ब्रँड हा अमूलपेक्षाही मोठा होईल.’’

‘‘अमूल दूध संघाने नाशिकमध्ये नुकतीच ८५० एकर जमीन घेतली आहे. तिथे ते म्हशीचा प्रकल्प उभारणार आहेत. तिथे उत्पादित म्हशीचे दूध मुंबई बाजारात आणून ‘गोकुळ’चे मार्केट ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘अमूल’सारखा एवढा मोठा प्रकल्प तर आम्ही उभा करू शकत नाही. परंतु त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हशीचे दूध उत्पादनवाढ करावीच लागेल. ‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखावर आहे. त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक - एक म्हैस जरी घेतली तरी ‘अमूल’चे आव्हान परतवण्यामध्ये यश मिळेल. म्हैस घेण्यासाठी केडीसीसी बँक अर्थसाह्य करील. गोकुळ दूध संघही त्यासाठी जास्तीत जास्त अनुदान देईल. म्हशी पंढरपुरी, मुरा, मेहसाणा अशा जातीच्या आणाव्या लागतील. जिल्ह्यातील म्हशी खरेदी करून दूध उत्पादन वाढ होणार नाही,’’ असेही मुश्रीफ म्हणाले.

दूध उत्पादन वाढीसाठी प्रत्येकाने एक - एक म्हैस घेतलीच पाहिजे. पुढच्या टप्प्यात ५० टक्के शेतकऱ्यांपर्यंत आपण ही मोहीम राबविली तर निश्‍चितच नव्याने दहा लाख लिटर दूध उत्पादन वाढेल.

- हसन मुश्रीफ, माजी ग्रामविकास मंत्री

गोकुळ दूध संघ म्हटले, की शेतकऱ्यांनी दूध उत्पादन करायचे त्यावर नेत्यांनी राजकारण करायचे, असे चित्र आहे. आता ‘गोकुळ’च्या नेत्यांनी म्हशी घेऊन स्वतः उत्पादक होण्याचा प्रयत्न केला आहे. या संकल्पनेच्या निमित्ताने निदान दूध उत्पादनातील अडचणी तरी नेत्यांना समजतील, अशी अपेक्षा दूध उत्पादकांनी व्यक्त केली. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) नेते, संचालक कर्मचाऱ्याकडून स्वतः म्हशी घेऊन त्याचे पालन पोषण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन म्हशी घेऊन या संकल्पाची पूर्तता केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com