Lemon Market : लिंबू पोहोचले ११ हजार रुपये क्‍विंटलवर

उन्हाळ्यात लिंबाला मागणी वाढते. त्याच्याच परिणामी उन्हाळा वगळता इतर कालावधीत लिंबाचे दर दबावात राहतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे.
Lemon Market
Lemon MarketAgrowon

Lemon Market नागपूर ः उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच लिंबूला देखील मागणी वाढली आहे. त्याच्याच परिणामी कळमना बाजार समिती (kalamana APMC) फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या २५०० ते २७०० रुपये क्‍विंटल याप्रमाणे व्यवहार होणाऱ्या लिंबाचे दर (Lemon Rate) मार्च महिन्यात १० ते ११ हजार रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. यापुढील काळात तापमानात वाढ झाल्यास या दरात आणखी सुधारणा होईल, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

उन्हाळ्यात लिंबाला मागणी वाढते. त्याच्याच परिणामी उन्हाळा वगळता इतर कालावधीत लिंबाचे दर दबावात राहतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे. आताही तीच परिस्थिती असून, कळमना बाजार समितीत लिंबाच्या दराने मोठी झेप घेतली आहे.

Lemon Market
Lemon Rate : अकोल्यात लिंबाच्या दरात तेजी

१ फेब्रुवारी रोजी लिंबाची १०० क्‍विंटल आवक आणि दर २५०० ते २७०० रुपये असा होता. त्यानंतर ३००० ते ३२००, ४००० ते ४५०० अशी दरात सुधारणा होत गेली. २५ फेब्रुवारी रोजी लिंबाला सर्वाधिक ७००० ते ८००० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला.

Lemon Market
Mumbai Lemon Rate : मुंबईत लिंबाच्या दरात वाढ

त्यानंतर थेट १३ मार्च रोजी लिंबाचे व्यवहार ८००० ते ९००० रुपये क्‍विंटलने झाले. दरात सुधारणा होत असताना आवक मात्र सातत्याने कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सुरुवातीला १०० क्‍विंटलची असणारी आवक आता अवघ्या २५ क्‍विंटलपर्यंत मर्यादित झाली आहे.

सध्या उन्हाळ्यामुळे मागणी वाढती आणि आवक कमी असल्याच्या परिणामी दर तेजीत आले आहेत. सध्या लिंबाला विक्रमी १०,००० ते ११,००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळत आहे. आवक अशीच राहिल्यास या दरात आणखी सुधारणांचे संकेत व्यापारी सूत्रांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com